पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बौद्धदर्शन. २११ श्रमधर्माप्रमाणे क्रिया केल्या असता, त्यापासून काहीएक फल प्राप्त होणार नाही. अग्निहोत्र, वेद, संन्यास, भरम धारण इत्यादि सर्व उपजीविकेची साधने आहेत. अशा प्रकारचे हे चार्वाक मत आहे. बौद्धदर्शन. आज मित्तीस ह्या जगांत चालू असणाऱ्या प्रमुख धर्मापैकी बुद्धधर्म हा एक आहे. सर्व लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक ह्या धर्माने वागतात. त्याची स्थापना व विरतार यांचा स्वतंत्र इतिहास लिहूं लागले, तर त्याचे अनेक ग्रन्थ होतील. सध्या या धर्माच्या दोन शाखा आहेत. सिंहलद्वीप किंवा लंका, सियाम, वगैरे देशांत प्रचलित असणारी एक शाखा, आणि तिबेट, चीन जपान इत्यादि देशांत चालू असणारा धर्म, ही दुसरी शा वा. काशीच्या उत्तरेस ५० कोसांचे अन्तरावर कपिम्तु नांवाचे एक शहर होतें, त्या शहराचा शुद्धोदन नांवाचा राजा सुमारे २५०० वर्षी पूर्वी त्या प्रदेशावर राज्य करीत होता. ह्या राजाच्या पार्टी बुद्धगौतमाचा जन्म झाला, त्याचें नांव सिद्धार्थ होते. बोधीसत्त्व असेंहि त्याचें नांव आहे. हा युवराज ऐषआरामांत आणि ऐहिक सुखोपभोगांत आपले दिवस घालवीत असतांना, या जगांतील जीवितयात्रा अति कष्टमय आति अशाश्वत आहे, ही गोष्ट त्याच्या लक्ष्यांत आली, आणि