पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. प्रत्यक्ष हेच एकटें प्रमाण किंवा ज्ञानप्राप्तीचे साधन आहे, असें चार्वाकांचे मत आहे. दुसरी प्रमाणे त्यांस मान्य नाहीत. अनुमान प्रमाणांत व्याप्तिज्ञान अगदी अवश्य आहे. हे व्याप्तिज्ञान मनुष्यास खात्रीलायक होते, त्याविषयी मनुप्यास कधीहि शंका येणार नाही, अशी गोष्ट होणे नाही. अविनाभावावर त्यांचा विश्वास नाही. धूर पाहिल्यावर त्याठिकाणी अग्नि आहे, हे जे ज्ञान होते, तें पूर्वी केव्हातरी धूमामीचा संबन्ध प्रत्यक्ष पाहिल्यावरून होते; किंवा तें ज्ञान भ्रममूलकहि असू शकेल. शब्दप्रमाण हे वैशेषिक मताप्रमाणे अनुमानांत अन्तर्भूत होते. अनुमान हेच प्रमाण मानले जात नाही, तर शब्दप्रमाण कसे मानले जाणार ? उपमान प्रमाण हे दुरापास्त होय. अनुमानादिकावरून तर्क केलेले फळ कदाचित् प्राप्त झाले, तर ते केवळ यदृच्छेनें झालें; असें समजावें. कार्यकारणसंबन्ध ह्या ठिकाणी काहीएक नसतो. चार्वाक 'अदृष्ट' असे काही आहे, ही गोष्ट मानीत नाहीत, जगांतील वैचित्र्य वस्तुस्वभावामुळे दिसून येते. अग्नि हा उष्ण असतो, पाणी हे थंड असते. ह्या सर्व गोष्टी स्वभावतः होतात. अशीच व्यवस्था आहे. जन्मास येऊन सुखोपभोग घ्यावा, हाच मनुष्याचा मुख्य पुरुषार्थ आहे. सुखाबरोबर दुःख येते किंवा सुखसंपादनाच्या कामी दुःख भोगावे लागते. ही स्थिति अपरिहार्य आहे, तथापि सुख संपादण्यास मागे पुढे पाहूं नये. ह्या मताप्रमाणे स्वर्ग नाही, मोक्ष नाही, आत्मा नाहीं, वर्णा