पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चार्वाक दर्शने. रून टाकिली आहे. या जगांत घेता येईल तितका सुखाचा उपभोग घ्यावा. हाच त्यांचा परमार्थ. असल्या मताचा एकदा प्रसार झाला म्हणजे, त्या मताचा उच्छेद करणे फार कठीण आहे. सामान्यतः पुष्कळशा लोकांची प्रवृत्ति ह्या मताप्रमाणे वागण्याची असते. म्हणूनच जणू काय ह्या मताला ' लोकायित ' म्हणतात. मृत्यु येणार नाही, अशी गोष्ट कधीहि होणार नाही. देहाची एकदा राख झाली म्हणजे आपल्याला पुनः देह मिळणार नाही. यासाठी यावज्जीव मिळेल तेवढे सुख भोगून घ्यावे. अर्थ आणि काम हेच कायते आपले पुरुषार्थ. ___ पृथ्वी, आप ( पाणी) तेज आणि वायु ही चार महाभूतेच मुख्य तत्त्वे आहेत. ह्यांच्या विशिष्ट घटनेपासून देह होतो. मद्यउत्पादक पदार्थात जशी मदशक्ति स्वभावतः होते, तशीच ह्या देहांत त्याची घटना झाल्यावर चैतन्य शक्ति उत्पन्न किंवा परिणत होते. देहाचा पात झाला की चैतन्यशक्तीचा नाश होतो. महाभूतांचा नाश झाल्यावर हे चैतन्य त्यांच्यामागून नाश पावतें. ह्या मतांस वेदाचा आधार आहे, असें चार्वाकानुयाय्यांचे मत आहे. बृहदारण्यकोपनिषदाचे दुसऱ्या अध्यायांतील चवथ्या ब्राह्मणांत बारावा मंत्र या अर्थाचा आहे. (विज्ञानघन एवैतेभ्यो भूतेभ्यः समुत्थाय तान्येवानुविनश्यति न प्रेत्य प्रज्ञाऽस्तीति ) ह्यावरून चैतन्ययुक्त असलेला देह हाच आत्मा, ह्याहून निराळा आत्मा नाही, असें चार्वकानुयायांचे मत आहे.