पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ प्रस्थानभेद. आहे, असें आपलें ( हिंदु धर्माचें ) मत असल्यामुळे ह्या वेद न मानणाऱ्या दर्शनांस नास्तिकदर्शनें म्हणतात. हिंदु लोकांच्या तात्विक विचारांच्या महान ओघांपैकींच ही नास्तिक मते अनेक प्रवाह असल्यामुळे त्या मतांचा जबरदस्त पगडा आपल्या आचारविचारांवर बसलेला आहे. यासाठी ह्या मतांविषयी थोडीबहुत माहिती येथे सांगितली तर ती अप्रासंगिक होणार नाही. ___ चार्वाक, बौद्ध मताचे चार पंथ, आणि आहेत किंवा जैन हे मत, अशी ही सहा दर्शने होत. चार्वाक मतांचा मूळ प्रवर्तक बृहस्पति आहे, अशी परंपरेने चालत आलेली समजूत आहे. त्यांचा स्वतंत्र ग्रन्थ उपलब्ध नाहीं, देवांचा गुरु बृहस्पति हाच तो बृहस्पति किंवा त्या नांवाचा दुसरा एखादा तत्त्ववेत्ता होऊन गेला, हे निश्चयात्मक असें कांहींच सांगता येत नाही. संजीवनी विद्या प्राप्त करून घेण्याकरितां शंकराची आराधना करण्यास जेव्हां शुक्राचार्य गेले होते, तेव्हा त्यांचे रूप धारण करून बृहस्पतीनीं अरांस उपदेश करण्यास आरंभ केला. यज्ञादिक, व धार्मिक कृत्ये न करतां केवल ऐहिक सुखाकडेच असुरांचे मन लागा आणि त्यांच्याकडून सदाचरण होऊ नये, असा बृहस्पतींचा उद्देश होता. त्यावेळी त्यांनी प्रसार केलेले मत बहुतेक चार्वाकमतासारखेच आहे. यावरून देवाचे गुरु हेच चार्वाक मताचे प्रस्थापक की काय अशी शंका येते. परमेश्वर आहे आणि तो आपल्यास निःश्रेयसत्व देईल, ही कल्पना चार्वाकाने झिटका