पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०७ नास्तिक दर्शने. ४७ अभिधानकोश, ४८ शेखरापीडयोजन, ४९ गंधयुक्ति, ५० भूषणयोजन, ५१ ऐन्द्रजाल, ५२ क्रौंचमारण योग, ५३ हस्तलाघव, ५४ चित्रशाकापूपभक्तविकारक्रिया, ५५ अक्षरमुष्टिकाकथन, ५६ देशभाषाज्ञान, ५७ च्छन्दोज्ञान, ५८ क्रियाविकल्प, ५९ वस्त्रगोपन, ६० द्यूतविशेष, ६१ आकर्षकक्रीडा, ६२ म्लेंच्छितकविकल्प, ६३ वैनायिकविद्याज्ञान वैजयिक विद्याज्ञान, ६४ वैतालिक विद्याज्ञान. पाशुपत तंत्रांत ह्या कलांविषयी विचार केलेला आहे. नास्तिक दर्शने. चार्वाकमत याज्ञवल्क्यांनी सांगितलेल्या चवदा विद्यांची माहिती शक्य तितक्या संक्षिप्त रीतीनें वर सांगितली आहे. ह्या चवदा विद्यांत सांख्य, योग, दोन न्यायदर्शने आणि दोन मामांसा यांचा अन्तर्भाव होतो. ह्या सर्व विद्या हिंदु धर्माची प्रस्थाने किंवा आधार ग्रन्थ आहेत असें मानिले आहे. वर सांगितलेल्या सहा दर्शनासारखींच दुसरी सहा दर्शनें आहेत, त्यांस नास्तिक दर्शनें म्हणतात. कारण ती दर्शनें वेदांस प्रामाण्य देत नाहीत. तथापि त्यांच्या मतांत अनुकूल अशी वेदवाक्ये त्या मतानुयाय्यांस सांपडली तर ती वाक्ये आधार म्हणून दाखविण्यात येतात. वेदांचे प्रामाण्य अबाधित