पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेद.. असते, किंवा एखादी गोष्ट जशी घडली असेल तशीच ती सांगितली असते. हा एक प्रकारचा भूतार्थ होय. दुसऱ्या प्रकारच्या भूतार्थात माहीत नसलेल्या वस्तूचे ( अज्ञाताचें ) व अबाधित वस्तूचें ज्ञान भूतार्थवादापासून प्राप्त होते. त्यांत प्रामाण्य असते. · आदित्यो यूपः , ( यूप हाच आदित्य होय ) हे गुणवादाचे उदाहरण होय. 'अग्निहिमस्य भेषजम् ' (थंडीला अग्नि औषध आहे. ) हैं अनुवादाचे उदाहरण आहे. इंद्रो वृत्राय वज्रमुद्यच्छत् हे व अशा गोष्टी ही भूतार्थवादाची उदाहरणे आहेत. ____ ज्या ब्राह्मणवाक्यांत कोणत्याहि एखाद्या कर्माविषयी विधि सांगितला नसतो किंवा ज्यांत यज्ञकर्माचा, किंवा त्यांच्या द्रव्यादिकांचा अर्थवादहि नसतो, किंवा विधि व अर्थवाद यासंबंधी वस्तुस्थिति किंवा एखादी गोष्ट सांगितली नसते, अशा सर्व ब्राह्मणवाक्यांत. वेदान्तपर विचार केला असतो. परमानन्द ज्ञानात्मक ब्रह्म हेच या वेदान्त. वाक्यांचा स्वार्थ आहे. याप्रमाणे विधिरूप, अर्थवादरूप आणि वेदान्तरूप असे ब्राह्मणाचे तीन भाग करतां येतात. कर्मकाण्ड, हे धर्म, अर्थ, काम, साधण्यास, व ब्रह्मकाण्ड हे मोक्ष प्राप्त करून देण्यास मोठी साधने आहेत. ___ वेदाचे दोनच मुख्य भाग-मंत्र आणि ब्राह्मण हे मंत्र गद्य किंवा पद्य असतात. त्यांत अनुष्ठान, द्रव्यदेवता इत्यादिकांचे वर्णन, स्तुति, वगैरे केली असतात. ब्राह्मणांत यागकर्मासंबन्धी सर्व माहिती दिली असते असें वर सांगितले आहेच.