पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपवेद. २०५ फौजेचे चार भाग असतात. दीक्षा, अभिषेक, शकुन आणि मंगलकरण इत्यादि सर्व कृत्यांचें, आणि वर सांगितलेल्या युद्धासंबंधी गोष्टींचे विवेचन पहिल्या पादांत केलेलें आहे. विशेष शस्त्रांची लक्षणे व आचार्याचे लक्षण सांगून शस्त्रांचा संग्रह करण्याचा प्रकार दुसन्या पादांत वर्णिला आहे. गुरुसंप्रदायाने सिद्ध झालेल्या विशिष्ट शस्त्रास्त्रांचा पुनः पुनः अभ्यास करणे, आणि मंत्रांची व देवतांची सिद्धि करून घणे, ह्यांचे निरूपण तिसऱ्या पादांत केले आहे. देवतार्चनाने आणि अभ्यासाने सिद्ध झालेल्या शस्त्रास्त्रांचा प्रयोग कसा करावा, हे चवथ्या पादांत सांगितले आहे. चोरादिकांपासून प्रजेचे पालन करणे, दुष्टांस दंडन करणे, आणि प्रसंगी युद्ध करणे, हेच क्षत्रियांचे धर्माचरण होय. त्यांच्यासाठी हा आयुर्वेद झाला आहे. ब्रह्माप्रजापती इत्यादि क्रमाने हा वेद येऊन शेवटीं विश्वामित्रांनीं तो प्रणीत केला. गांधर्व वेदः--हे शास्त्र पहिल्यांदा भरताने प्रणीत करून ते लोकांत प्रसिद्वीत आणले. गीत ( गाणे) वाद्य ( बजावणं) नत्य ( नाच ) इत्यादि मन तल्लीन करण्याचे अनेक प्रकार या शास्त्रांत आलेले आहेत, त्यामुळे हे नानाविध असें आहे. देवताराधन, निर्विकल्पसमाधि इत्यादि स्तुत्यकामांत ह्या सर्व गोष्टींचा उपयोग व्हावा ह्या हेतूनें हें शास्त्र प्रचलित केले आहे. मनोरंजनाचे अपूर्वसाधन अशा दृष्टीने ह्या वेदाचा समाजास केवढा उपयोग आहे, हे सांगावयास नको. मनुष्यमात्रास त्यापासन आनंद होतो.