पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ प्रस्थानभेद. प्राप्त होते हेच सांगण्याकरितां, हा ग्रंथ लिहिला असावा असे वाटते. रोग, रोगाची कारणे, रोगनिवृत्ति आणि आरोग्याची साधनें ही समजून घेणे, हे चिकित्साशास्त्राचे प्रयोजन होय. धनुर्वेदः-हा वेद विश्वामित्रांनी प्रणीत केला आहे. (१) दीक्षापाद; ( २ ) संग्रहपाद, ( ३ )सिद्धिपाद; आणि ( ४ ) प्रयोगपाद; असे या ग्रंथाचे चार पाद किंवा भाग आहेत. पहिल्या पादांत धनु शब्दाचे लक्षण आणि अधिकारी यांचे निरूपण केले आहे. धनुःशब्दाचा अर्थ येथें व्यापक आहे. युद्धांत जी जी म्हणून शस्त्रास्त्रे उपयोगांत येतात, त्या सर्वाचा बोध धनुशब्दाने होतो. ही आयुधे चार प्रकारची असतात. मुक्त, अमुक्त, मुक्तामुक्त आणि यन्त्रमुक्त, असे त्यांचे चार वर्ग आहेत. चक्रादि ही मुक्त आयुधे होत. तरवार, त्रिशूल ही अमुक्त आयुधे होत. शल्य आणि त्याचे जे अवान्तर भेद आहेत, ती सर्व मुक्तामुक्त आयुधे होत. आणि बाण वगैरे ही यन्त्रमुक्त आयुधे आहेत. ' मुक्त ' आयुधांस ' अस्त्रे' म्हणतात. 'अमुक्तांस शस्त्र हे नांव आहे. ब्रह्मा, विष्णु, पशुपति, प्रजापति, अग्नि, इत्यादि अनेक देवतांनी अधिष्ठित अशी ही चार प्रकारची आयुधे असल्यामुळे त्यांचे भेदहि अनेकविध होतात. ही समंत्रक आणि साधिदेवत शस्त्रास्त्रे शिकण्याचा अधिकार क्षत्रियांस व त्यांच्या अनुयाय्यांस आहे. पायदळ, घोडेस्वार, रथी आणि हत्तीवर बसणारे, असे