पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपवेद. २०३ पाय, इंद्रियादिपासून सचित होणारी अरिष्टचिन्हें. वगैरे वगैरे. ६ सहावें स्थान चिकित्सास्थान; ह्या स्थानांत रसायन औषवे, वाजीकरण औषधे, ज्वरादि रोग, ऊर्ध्वाग, स्त्री व बाल यांचे रोग, त्या रोगांची चिकित्सा, इत्यादि विषय आले आहेत. ७ कल्पस्थान में सातवें स्थान होय. ह्या भागांत अनेक औषधींचे कल्प सांगितले आहेत. उदा. हरणार्थ, आवळे, गेळफल, कडू दुध्या, कुडा, आघाडा, निशोत्तर, बहावा, हिंगणबेट, निवडुंग, शंखिनी वगैरे. .... ८ आठवें व शेवटचे स्थान हे सिद्धिस्थान आहे. ह्या स्थानांत स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन आणि बस्ति ह्या .क्रिया कोणास, केव्हां, कशा व काय प्रमाणाने करावयाच्या, आणि त्यांचा कमजास्त योग झाला असतां, काय उपाय करावे, इत्यादि गोष्टींचा विचार येथे केला आहे. चरक संहितेचा सारांश ह्याप्रमाणे आहे. ह्यावरून आपल्या सहज लक्षात येईल की, शस्त्रक्रिया खेरीजकरून वैद्यकांतील बहुतेक सर्व विषयांचा विचार चरकांत केलेला आहे, वैद्यकांत वाजीकरणाचा विचार केला असतो, म्हणून कामशास्त्राचा अन्तर्भाव वैद्यकांतच होतो, असें मानिले आहे. कामशास्त्रावर वात्स्यायनाचा एक ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाचे पांच अध्याय आहेत. शास्त्रोक्त रीतीने विषयभोग केला तरी दुःखच होते, असे दाखविण्यासाठी हे शास्त्र लिहिले आहे, असे काही लोकांचे मत आहे. वस्तुतः आहारविहारादिकांस नियमितपणा असावा, म्हणजे आरोग्य