पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ प्रस्थानभेद. दिसते. निरनिराळ्या ग्रन्थकारांनी ह्या अंगांचा विचार निरनिराळ्या स्थानांत केला आहे, हे वर सांगितलेच आहे. अग्निवेश्याने चरक संहितेची आठ स्थाने केली आहेत, त्याची नांवें व सारांश पुढे दिली आहेत. सुश्रुत व वाग्भटांनी केलेल्या पांच स्थांनांची नांवें येणें प्रमाणेः-१ सूत्र, २ शारीर, ३ निदान, ४ चिकित्सा आणि ५ कल्प. चरकसंहितेतील पहिले स्थान सूत्रस्थान. ह्यांत मुख्यत्वेकरून शरीरारोग्यरक्षण, स्नेहस्वेदादि विचार, उदर वगैरे रोगांची कारणे व लक्षणे, अन्नपानविधि, मधुरादिरस, मर्मस्थाने, इत्यादि विषयांचा विचार केला आहे. २ दुसरें निदान स्थान; यांत, ज्वर, रक्तपिती, गुल्म, प्रमेह, कुष्ठ, उन्माद व अतिसार यांचा विचार आहे. ३ तिसरें विमानस्थान; ह्यांत रसद्रव्य दोषविकार, प्रभाव, आहारमात्रा, तत्परिणाम, रोगांच्या सांथी, रोगपरीक्षणसाधन, कृमिभेद, लक्षणविचार, वैद्यकाचे अध्यापन व अध्ययन इत्यादि गोष्टींचा विचार केला आहे. ४ चवथें स्थान शारीरस्थान; ह्यांत गर्भावक्रान्ति, धातुक्षयवृद्धिविचार, स्वचादि शारीर अवयवांची संख्या, गर्भस्थापन व्याख्या, गर्भिणीव्यवस्था, प्रसव, धात्रीपरीक्षा, अरिष्टलक्षणे, आयुर्मर्यादा, वगैरे गोष्टी आल्या आहेत. ५ पांचवें स्थान. इंद्रिय- । स्थान; ह्या स्थानांत अनेक भिन्नभिन्न विषय आले आहेत. वर्ण, स्वर, गंध, रस, स्पर्श, इंद्रिये, शील, सत्त्व, स्मृति, ग्लानि, तंद्रा, बल, आचार, आहार, आहारपरिणाम, उपाय, अ