पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपवेद. २०१ आहे. अथर्ववेदांत वैद्यकाविषयी माहिती आहे. ह्या उपदिष्ट आयुर्वेदांत आठ अंगांचा विचार केला असतो. निरनिराळ्या ग्रन्थकारांनी ह्या अंगांचा समावेश निरनिराळ्या भागांत किंवा स्थानांत केला आहे. चरक ग्रन्थांत आठस्थानें कल्पिली आहेत. सुश्रुत व वाग्भट, हे पांच स्थाने करतात आणि उत्तरस्थान असा एक सहावा भाग त्यांच्यांत असतो. वर सांगितलेली आयुर्वेदाची आठ अंगे अशी आहेत:(१) कायचिकित्सा ( ज्वरादिकांची चि. ) २ बालचिकित्सा (. लहान मुलांच्या रोगांची चि.) ३ ग्रहचिकित्सा किंवा भूतविद्या. ( भूत गंधर्वादिकांच्या पीडेची चि.), ४ ऊबीग किंवा शालाक्य चिकित्सा (मुख, कंठ, नेत्र, नासिका कर्ण, मस्तक इत्यादिकांचे रोगांची चि.), ५ शल्यचिकित्सा शरीरांत बाहेरून आलेले पदार्थ किंवा आंतच झालेले विकृत पदार्थ यांची चि. ) डागणे, रोग कापणें क्षारकर्म इत्यादि क्रियांचा ह्यांतच समावेश होतो. ६ दंष्टाचिकित्सा किंवा आदतंत्र सर्वादिकांचे विष, सोमल बचनाग, इत्यादि विषारी पदार्थ चिकित्सा ). ७ जराचिकित्सा किंवा रसायणतंत्र ( जरा किंवा त्यासारखी स्थिति काढून टाकून तारुण्य आणणे याची चि.) आणि ८ वृतचिकित्सा किंवा वाजीकरण ( शरीरांत उत्तमवीर्य, सामर्थ वगैरे उत्पन्न करण्याची चिकित्सा.) काल, स्थान, आणि चिकित्सा, ह्या तीन भिन्न विचारदृष्टीने किंवा तत्त्वावर ही आठ अंगे ठरविली असावीत, असें