पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० प्रस्थानभेद. ११८ मंत्रेश्वरांच्या पदांस नेतो. ( ८ मंडली, ८ क्रोध, . १ वीरेश, १ श्रीकण्ठ आणि १०० रुद्र=११८ मंत्रेश्वर ) अशा लोकांच्या कर्मादिकांचा परिपाक होऊ नये म्हणून ईश्वर स्वतः आचार्यांचा अवतार घेऊन त्यांस दीक्षा देतो आणि पुण्यमार्गास लावून मोक्षास नेतो. ___ ह्या शैवदर्शनांतील तिसरा पदार्थ पाश आहे असें वर सांगितलेच आहे. पाश म्हणजे बन्ध. जीवात्म्यास संसारांत नेहमी बांधून ठेवणारी कारणे, यांस पाश म्हणतात. मल, माया, कर्म आणि रोधशक्ति असे हे चार प्रकारचे पाश आहेत. बिंदु हा पांचवा पाश आहे, असें कांहीं जनांचे मत आहे. हा परममुक्ति वगैरे देणारा असल्यामुळे, तो पाशवगर्गात येथे गणिला नाही. शैव दर्शनाच्या मताप्रमाणे, पति, पशु आणि पाश, हे तिन्ही पदार्थ नित्य आहेत. चाहत. . उपवेद. ___ जसे चार वेद आहेत तसेच चार उपवेद आहेत. (१.) आयुर्वेद, (२) धनुर्वेद, ( ३ ) गांधर्ववेद आणि (४) अर्थशास्त्र. ___ आयुर्वेद--ब्रह्मा, प्रजापति, अश्विनीकुमार, इन्द्र, धन्वन्तरि, भारद्वाज, आत्रेय आणि अग्निवेश्य, यांनी आयुर्वेदाचा उपदेश प्रथम केला, अशी परंपरेने आलेली समजूत