पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शैवदर्शन. मंत्रांत त्याचा समावेश होतो. दुसऱ्या वर्गातील म्हणजे प्रलयाकल जीवात्म्यांची मल व कर्म ही परिपक्व झाली असली, तर त्यास मोक्ष मिळतो. त्यांचे हे दोन पाश तुटले पाहिजेत. ज्यांचे हे दोन पाश परिपक्क झाले नसतात, त्यांना पुर्यष्टक देह प्राप्त होऊन अनेक योनीत जन्म घेत फिरत राहिले पाहिजे. प्रत्येक जीवात्म्यास सर्गापासन तो कल्पान्तापर्यंत किंवा मोक्ष मिळेपर्यंत, हा पुर्यष्टक नांवाचा देह धारण करावा लागतो. हा देह ३१ तत्वांचा बनला असतो. (स्यात्पुर्यष्टकमन्तःकरणं धीः कर्मकरणानि") ही तत्त्वे येणे प्रमाणेमन, बुद्धि, अहंकार व चित्त ( अन्तकरणचतुष्टय ) ह्या अन्तःकरणाबरोबर सात विद्यातत्त्वे येतात. ती अशी कला ( शमदमादचे सामर्थ्य; ) काल, नियति, विद्या, राग, प्रकृति आणि सातवें तत्त्व 'गुण' ( पुरुष असे कोणी मानतात ). पांच तन्मात्रा व पांच महाभूते आणि पांच कर्मेन्द्रिय व पांच ज्ञानेंद्रिये ही सर्व मिळून ३१ तत्त्वे होतात. ह्या तत्त्वांनी युक्त सर्व देह असतात. ह्या तत्त्वांस पुर्यष्टक म्हणतात. हे अष्टक आहे, तेव्हां ह्या तत्त्वांचे बरोबर आठ विभाग पाहिजेत, असे कोणी म्हणेल तर ते भाग याप्रमाणे होतील. १ अन्तःकरणचतुष्टय. २ कलापंचक, ३ प्रकृति, ४ गुण ( पुरुष ), ५ तन्मात्रा, ६ महाभूतें, ७कर्मेन्द्रिये,आणि ८ज्ञानेंद्रियें. 'सकल' नावाच्या तिसऱ्या वर्गातील पशूचे (जीवात्म्याचे) पक्ककलुष आणि अपक्वकलुष, असे दोन विभाग केले आहेत.पक्क कलुषांना ईश्वर कृपाळू होऊन