पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. मुक्तात्मे, शिवत्व मिळालेले आचार्यादि, आणि शिवत्व प्राप्त करण्याचे दीक्षादि उपाय या सर्वाचा अन्तीव 'पति शब्दांत होतो. ___ ह्या दर्शनांतील दुसरा पदार्थ पशु आहे. पशु म्हणजे जीवात्मा. ह्याला क्षेत्रज्ञ, अणु, अशीहि नावे आहेत. जीवात्मे अनेक, विभु, नित्य, अप्रमेय, देहापासन भिन्न असे असतात, जीवात्म्यांत कर्तृत्व, भाक्तत्व, हे दोन्ही गुण असतात. १ विज्ञानाकल, २ प्रलयाकल, आणि ३ सकल असे ह्या पशूचे किंवा जीवात्म्याचे तीन भेद केलेले आहेत. कर्मफलाच्या भोगाने किंवा विज्ञान, योग, अथवा संन्यास, यांच्या साहाय्याने सर्व कर्माचा नाश झाल्यावर आणि कलादि भोग नसल्यामुळे हा जीवात्मा (पशु) फक्त मलानेंच युक्त असतो. केवल मलयुक्त जो जीवात्मा त्यास विज्ञानाकल म्हणतात. प्रलयाने कलादिकांचाच मात्र उपसंहार होतो. मल आणि कर्म ही रहातात. ह्या मलकीनी युक्त जो पशु ( जीवात्मा ) त्याचे प्रलयाकल' हे नांव आहे. मल, माया ( कला ! ) आणि कर्म ह्या तीन बन्यांनी जो जीवात्मा बद्ध असतो तो सकल जीवात्मा होय. पहिल्या वर्गातील जीवात्म्यांचं कल्मष (पाप) समाप्त झाले असले, तर त्यांस विद्यश्वरांचे पद प्राप्त होते ( अनन्त, सूक्ष्म, शिवोत्तम, एकनेत्र, एकरुद्र, त्रिमूर्तिक, श्रीकण्ठ आणि शिखंडी असे विश्वेश्वर आहेत. ). ज्या जीवात्म्याचे कलुष समाप्त झाले नाही, त्यांस सातकोटी मंत्रांची ईश्वरकृपेने योग्यता येते. त्या