पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शैवदर्शन. देत असतो. प्राण्यांच्या कर्मावर त्यांचे सुखदुःख अवलंबून असते, म्हणून ह्याकामी ईश्वराचे स्वातंत्र्यास हीनता येते, असें नाही. सिद्धगुरूंचे असे म्हणणे आहे की, स्वातंत्र्याचे खरे स्वरूप म्हटलें म्हणजे स्वतंत्रास वाटेल तर कार्य करण्यास त्याने साधनांचा उपयोग करावा, किंवा साधनाधीन न रहातां आपण स्वतःच कर्माची अपेक्षा न धरतां कार्य करावें. कर्माची अपेक्षा न धरतांच कार्य केले तर स्वातंत्र्य आहे असे होत नाही. म्हणून कर्मापेक्षतेमुळे ईश्वराच्या कर्तृत्वास कमीपणा येत नाही. कर्माचे फलाचा भोग, त्यांची साधने व उपादान कारणे, ही ज्याला माहीत आहेत तोच त्यांचा कर्ता होय, दुसरा कोणी त्यांचा कर्ता असणे शक्य नाही. असेंच बृहस्पतीनी सांगितले आहे. ईश्वर सर्वकर्ता आहे; तो सर्वात्मा आहे, म्हणून सर्वज्ञ आहे. अज्ञानी जो आहे त्याच्या अंगी कर्तृकशक्ति येणार नाही. हे जगदपी कार्य उत्पन्न करणाऱ्या ईश्वराच्या ( शिवाच्या ) पांच शक्ति आहेत. ह्या पांच शक्ति 'सद्योजातं प्रपद्यामि ' इत्यादि पांच मंत्रांत वर्णिल्या आहत. त्या शक्ति ईश्वराचे शरीर होत. ईश्वराची पांच कृत्ये ह्या पांच शक्ति करतात. जगताची उत्पत्ति, स्थिति, लय, तिरोधान आणि अनुग्रह ही पांच कृत्यं ईश्वराचे शाक्त शरीराकडून होत असतात. ह्या स्वरूपाचे विद्वान लोक ध्यान करतात. वेद व पुराणे यांत शिवाची भ्वरूपें अनेक प्रकारांनी वर्णिली आहेत. ती अधिकारपरत्वें भक्तांसाठी आहेत. परमेश्वर,