पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. भात कांडतो; तूप पातळ करतो. भातांचे कांडून तांदूळ होणे, व घट्ट तुपाचे पातळ होणे, ह्या दोन्ही त्यांच्या पूर्व स्वरूपांत विकृति झाल्या असतात. ४ थे संस्कृतिगुणकर्म "नीहीन् प्रोक्षति" तांदूळ धुतो.येथे धुण्याचा संस्कार तांदुळांवर होतो, म्हणून हे संस्कृतिगुणकर्म समजावें. ह्याच चार गुणकर्मास ( यागाची-कर्माची) अंगे म्हणतात. अर्थकर्म हे क्रतुकाराच्या संबंधाने सांगितले असते. ह्या अर्थकर्माचे दोन भाग असतात. दुसऱ्याकरितां केलेले आणि दुसऱ्याकरितां नव्हें, आपल्या स्वतःकरितां जें कर्म केलेले असतें तें. अन्यार्थ केलेल्या कर्मास अंग म्हणतात. अनन्याकरिता केलेल्या कर्मास · प्रधान ' असे म्हणतात. याप्रमाणेच सर्व विधिवाक्ये समजून घ्यावीत. ब्राह्मणाचा दुसरा भाग अर्थवादरूप ब्राह्मण. एकाद्या वस्तुची स्तुति किंवा निंदा या वाक्यांत केली असते व त्याबरोबर विधिविशेषहि सांगितला असतो, अशा वाक्यास ' अर्थवाद म्हणतात. अर्थवादाचे तीन भेद आहेत. १ गुणवाद, २ अनुवाद आणि ३ रा भूतार्थवाद. कोणत्याहि गोष्टींमधील विरोध दिसत असून त्या इष्टकार्यास गुणावह आहेत, असें ज्या वाक्यांत दाखविले असते, त्यास गुणवाद म्हणतात. एखाद्या वस्तुविषयी ज्ञान पूर्वी असतांही, किंवा करून दिल्यावर तें ज्ञान निश्चित व दृढ होण्यास जें पुनः पुनः सांगितले असते, त्यांस अनुवाद म्हणतात. भूतार्थवादांत वस्तुस्थिति जशी असते तशीच्या तशीच सांगितली