पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Kanoon १९६ प्रस्थानभेदः तीनच पदार्थ आहेत असे सांगितले आहे. पति, पशु आणि पाश, हे ते तीन पदार्थ होत. विद्या, क्रिया, योग आणि चर्या, असे ह्या तंत्राचे चार चरण आहेत. म्हणजे ही चार मुख्य साधने आहेत, असे ते माहेश्वर मानतात. साक्षात् शिव हाच पति आहे, असें ह्या पंथाचे मत आहे. मुक्ति मिळालेले जीवात्मे व विद्येश्वरादिक लोक यांस शिवत्व प्राप्त झाले आहे, हे खरें, तथापि ते स्वतन्त्र नाहीत, कारण ते परमेश्वरावर अवलंबून असतात. ते परतंत्र आहेत. सप्तलोकादि सर्व वस्तूंमध्ये विशेष रचना दिसून येते; त्यावरून हे सर्व पदार्थ कार्ये आहेत असे दिसून येते. त्यांच्या कार्यत्वावरून ते पदार्थ बुद्धिमान पुरुषाने निर्माण केले आहेत, असें अनुमानाने ठरते. अशा अनुमानानें परमेश्वराचे अस्तित्व प्रसिद्ध होतें. देह होत असतांना कोणालाहि दिसत नाहीं, तेव्हां देह कार्य नाही, आणि देह कार्य नाही म्हणून त्याला कर्ता नाही, असे म्हणणे सयुक्तिक होणार नाही. देहाचे कार्यत्व अनुमानाने सहज सिद्ध करता येईल; देहांत विशेषरचना दिसून येते. विशेषरचनेमुळे तो देह केलेला आहे. तो कार्य आहे; कार्य आहे म्हणून त्याला की असला पाहिजे. आत्म्यासारखा देह नाही. त्याला कर्ता आहे. हा कर्ता ईश्वर आहे. अशा अनुमानाने ईश्वराचे कर्तृत्व सिद्ध केलेलें आहे. अज्ञ जीवजन्तूंचे सुखदुःख त्यांच्या स्वाधीन नाहीं, ईश्वराच्या प्रेरणेने ते स्वर्गात किंवा नरकांत जातील, तथापि ईश्वर प्राण्यांच्या कर्मानुरूप त्यांस सुख किंवा दुःख