पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शैवदर्शनः .. १९५० प्रमाणे जीवाला पुनरावृत्ति येईलच असे नाही. त्याच्या आचरणानुरूप त्याला ईश्वरसामीप्य हा मोक्ष मिळेल. निरपेक्ष ईश्वर जगताचे कारण आहे, असे मानिलें असतां कीस विफलता येईल, आणि सर्व कार्ये एका समयींच होतील, असे दोन आक्षेप यांच्या मतावर प्रतिपक्षाचे लोक आणतात. त्या आक्षेपांत अर्थ नाही, असे या मतानुयाय्यांचे ह्मणणे आहे. केवळ ज्ञानाने किंवा साक्षात्काराने मोक्ष प्राप्त होत नाही. तत्त्वांचा निश्चय यथार्थ झाला पाहिजे. यथावत तत्त्वनिश्चयावांचून मोक्ष मिळणार नाही. पंचार्थ पाशुपत मताच्या साहाय्याने तत्त्वनिश्चय होतो, असे त्यांचे मत आहे. खाली दिलेल्या श्लोकावरून ही गोष्ट चांगली लक्ष्यांत येईल. ज्ञानमात्रे यथाशास्त्रं साक्षाद् दृष्टिस्तु दुर्लभा ॥ पंचादन्यता नास्ति यथावत्तत्त्वनिश्चयः ॥ शैवदर्शन. नकुलीश पाशुपतदर्शनांत निरपेक्ष ईश्वर कारण मानला आहे. हे मत कांहीं माहेश्वरांस पसंत नसल्यामुळे त्यांनी आपले स्वतःचेच निराळे शास्त्रप्रतिपादन केलें.त्याला शैवदर्शन म्हणतात. त्यांच्या मतें निरपेक्ष ईश्वर कारण मानला तर वैषम्य व नैधुण्य यांचा दोष ईश्वराकडे येतो; म्हणून ते लोक सापेक्ष ईश्वर कारण आहे, असे म्हणतात. ह्या शैवदर्शनाचे महातंत्रांत,