पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. आसक्ति ( संग) च्युति, आणि पशुत्व, या सर्वांची हानि ( नाश) करणे. त्यांची हानि झाल्यावर विशुद्धि मिळते. (७) दीक्षाकारीपंचकः--द्रव्य, काल, क्रिया, मूर्ति आणि गुरु. ही दीक्षा घेण्यास अगदी अवश्य आहेत, आणि ८ वें बलपंचक:-गुरुभक्ति, प्रसन्नमति, सुखदुःख रागद्वेष अशा द्वन्द्वांवर जय. धर्म आणि अप्रमाद ( जपून काळजीपूर्वक वागणे), ही पांच बलें अवश्य हवींत. मलपंचक कमी कमी होत जावे, यासाठी भिक्षा, दिलेले अन्न किंवा अकस्मात् मिळालेले अन्न, यांवर निर्वाह करावा असे सांगितले आहे. ____ ह्या मताचे अभिमानी लोक आपल्या मतांत दुसऱ्या मतांपेक्षा काही विशेष आहे असे म्हणतात. तो विशेष असा. दुसरी शास्त्रे दुःखाची निवृत्ति झाली ह्मणजे दुःखांचा अंत झाला असे मानतात. ह्या शास्त्राप्रमाणे दुःखनिवृत्ति होऊन पारमैश्वर्य मिळाले झणजे दुःखान्त होतो. दुसरे लोक कार्य अनित्य आहे असे मानतात. पशु इत्यादि कार्य नित्य आहेत, असे यांचे म्हणणे आहे. कारण सापेक्ष असते, असें अन्यशास्त्राचे मत आहे. निरपेक्ष ईश्वर हाच कारण आहे, असें पाशुपतमताभिमानी म्हणतात. योगापासून कैवल्यादि फल प्राप्त होते, असे दुसऱ्यांचे मत आहे, ह्यांच्या मताप्रमाणे योगापासून पारमैश्वर्य मिळून दुःखाचा अंत होतो. स्वर्गादींचा भोग झाल्यावर जीवाला पुनः संसारांत जावे लागते, असें दुसरी शास्त्रे म्हणतात, ह्या शास्त्रा