पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नकुलीश पाशुपतदर्शन. १९३ रण, अवितत्करण आणि अवितद्भाषण, असे ह्याचे सहा भेद आहेत. उपहाराचे प्रकार ज्यांना दीक्षा मिळाली नाहीं अशा लोकांच्या समक्ष करूं नयेत. __गुरूचे लक्षण सांगतेवेळी आठ पंचकें आणि वृत्ती यांचे वर्णन केले आहे. या पंचकांचे पूर्ण ज्ञान होऊन त्याप्रमाणे आचरण झाले असतां पुरुषार्थसिद्धि होते. (१) लाभपंचक:-त्यांत ज्ञान, तप, नित्यत्व, स्थिति, आणि शुद्धि ही पांच येतात. लाभ म्हणजे उपायांचे फल. (२) मलपंचकः आपल्या मनांत दुष्ट भाव जे असतात, त्यांना मल म्हणतात. मिथ्याज्ञान, अधर्म, आसक्ति, हेतु आणि च्युति, ही पांच आपल्या अन्तःकारणाचे मल आहेत. ती पशुत्वाच्या मूळाशी आहेत. त्यांचा नाश केला पाहिजे. (३) उपायपंचकः-साधकास शुद्धि मिळविण्यास पांच उपाय आहेत. ते हेःवासचर्या, जप, ध्यान, रुद्राचे स्मरण आणि लाभांची प्रतिपत्ति. ( ४ ) देशपंचक, ज्ञान आणि तप यांची वृद्धि होण्यास स्थळ चांगले पाहिजे. गुरु, जन, गुहा, श्मशान आणि रुद्र ह्या पांचाजवळ रहावें. (५) अवस्थापंचकलाभ होईपर्यंत कोणत्यातरी ठिकाणावर राहणे, त्यास अवस्था म्हणतात. व्यक्त, अव्यक्त, जप, दान आणि निष्ठा, अशा त्या पांच आहेत. (६) विशुद्धिपंचक. वर सांगितलेलें मिथ्याज्ञानादिक जे मलपंचक, तें समूळ नाहींसें झाले म्हणजे विशुद्धिपंचक साधले जाते. अज्ञान, अधर्म,