पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. मतांतील २३ तत्त्वांचा अन्तर्भाव ह्या मताच्या · कलेत ' होतो. पशु म्हणजे जीवच होय. हा सांजन किंवा निरंजन असतो. शरीर व इंद्रिये यांशी संबद्ध जीवाला सांजन जीव म्हणतात. शरीरोन्द्रियांनी संबद्ध नसलेला जीव निरंजन होय. चित्ताचेद्वाराने आत्मा आणि ईश्वर यांचा जो संबन्ध जडतो त्याला पाशुपत योग म्हणतात. जप, ध्यान इत्यादि क्रिया करून साध्य होणाऱ्या योगास क्रियायोग म्हणतात. दुसऱ्या प्रकारचे योगांत क्रियेचा उपरम असतो, म्हणजे क्रिया कांहीं एक करावयाची नसते. त्या योगाला संवियोग अशी संज्ञा आहे. कर्मयोग आणि ज्ञानयोग हे जे दोन मार्ग योगशास्त्रांत सांगितले आहेत तसेच किंवा तेच हे आहेत. धर्मार्थसाधन ज्याच्या योगाने होते, त्यास विधि म्हणतात. प्रधानविधि आणि गौणविधि असे विधीचे दोन भेद केले आहेत. धर्माचा हेतु जी चर्या तो प्रधानविधि होय. भस्मस्नान, भस्मांत शय्या करणे,जप, प्रदक्षिणा आणि उपहार ही उपासनेंतील चर्येची मुख्य व्रतें असतात. हसणे, गाणे, नृत्य, नमस्कार, जप आणि हुडुक्कार हे सहा उपहाराचे प्रकार आहेत. ' द्वार ' या नावाने प्रसिद्ध असलेला चर्येचा दुसरा एक प्रकार आहे. *कथन, स्पन्दन, मंदन, शृंगा

  • टीप:-क्रथन म्हणजे झोप लागली नसून झोप लागली आहे असे दाखविणे. २ स्पंदन शरीराचा कंप. ३ मंदन-हात. पाय लुले झाले आहेत, असे चालणे. ४ शंगारण अमुक पुरुषासारखा शंगार करणे. ५ अवितत्करण वेड्यासारखें किंवा मू.. सारखें आचरण, आणि ६ अवितत्भाषण त्यांच्यासारखें भाषण,