पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नकुलीश पाशुपतदर्शन. १९१ सारखा वेग त्यांच्या अंगी येतो; त्याला इच्छेस वाटेल तें रूप धारण करता येते; आणि इंद्रियांचा व्यापार बंद ठेऊन पाहिजेल तें काम, हवें तेथें, आणि हवे तेव्हां, करण्याचे सामर्थ्य मनुष्याचे अंगी येते. सारांश योगशास्त्रांत सांगितलेल्या अष्टसिद्धि मनुष्याने संपादन केल्यावर त्याला जें ऐश्वर्य येतें तें आले असतां, सात्मक दुःखान्त होतो. .. सर्व कार्ये अस्वतंत्र-पराधीन अशी असतात. विद्या, कला आणि पशु असे कार्याचे तीन भाग किंवा प्रकार मानले आहेत. 'पशु' म्हणजे आब्रह्मस्तंभपर्यंत सर्व प्राणीवर्ग. यांच्या गुणाला ' विद्या ' हे नाव दिले आहे. विद्या बोधस्वभावा किंवा अबोधस्वभावा असते. बोधस्वभावा विद्येची प्रवृत्ति विवेकपूर्वक होत असते, किंवा विवेक न करतां होते. या रीतीने तिचे दोन पोटभाग होतात. विवेकपूर्वक प्रवृत्त होणाऱ्या बोधस्वभावा विद्येला चित् म्हणतात. ह्या चित्शक्तीच्या योगाने सर्व प्राणीमात्रांस बाह्य पदार्थाचे ज्ञान होते. ही प्रमाणांनीच समजून येते. .. कला स्वतः अचेतन आहे आणि ती चेतनावर अवलं. बून असते. हिचे कार्य आणि कारण असे दोन भाग करतात. कार्यकला म्हणजे पांच महाभतें ( पृथ्वी वगैरे ), तन्मात्रा, आणि त्या तत्त्वांचे रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द, हे पांच गुण. ही दोन्ही मिळून कार्यकलेचे दहा पोटभाग होतात. कारणकलेत तेरा भाग आहेत. पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेंद्रियें, बुद्धि, अहंकार आणि मन, सांख्य