पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

TH १९७ प्रस्थानभेद. केले आहे. ह्या शास्त्राचे पांच अध्याय केले आहेत. त्याचे पहिलें सूत्र " अथातः पशुपतेः पाशुपतयोगविधि व्याख्यास्यामः " आध्यात्मिकादि तीन प्रकारच्या दुःखांचा अंत कसा होईल ? असा शिष्याने प्रश्न केल्यावरून गुरु दुःखांन्ताचे प्रतिपादन करीत आहेत, असा ह्या सूत्रांतील ' अथ' शब्दाचा अर्थ आहे. पशु म्हणजे कार्य,—हें जगत् किंवा परतंत्र असलेली वस्तु. पति ह्या शब्दाचा अर्थ ईशिता ( ईश्वर ) आहे. तो या सर्व जगताचे कारण आहे. योग आणि विधि या दोन शब्दांचे अर्थ पुढे सांगितले आहेत. दुःखाचा अंत दोन प्रकारचा असतो. (१) अनात्मक आणि (२) सात्मक. सर्व दुःखांचा अत्यंत समूळ उच्छेद ( नाश ) झाला म्हणजे त्या दुःखान्ताला अनात्मक दुखान्त म्हणतात. (२) आपल्या बुद्धीची शक्ति किंवा ज्ञानेंद्रियाची शक्ति ( दृक्शक्ति ), आणि कोणतेंहि काम करण्याची शक्ति (क्रियाशक्ति), ह्या दोन शक्तींचा मनुप्यांच्या अंगों फार मोठा विकास होत असतो. असा कास झाला म्हणजे त्याला एका प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त झाल्यावर त्याच्या दुःखाचा जो अंत होतो, त्यास सात्मक दुःखान्त असें नांव आहे. याचा प्रभाव असा आहे की, एक दृगिंद्रिय सर्व इंद्रियांचे पृथक् पृथक् व्यापार एकटें करते, आणि मनन, विज्ञान, आणि सर्वज्ञत्व, हीहि त्याच्या अंगीं असतात. क्रियाशक्तीच्या प्रभावामुळे मनुष्य मनोजवी, कामरूपी, आणि विक्रमणधर्मी होतो. ह्मणजे मनाच्या वेगा