पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाकुलशि पाशुपतदर्शन. १८९ स्वाध्याय ( अभ्यास ) करणे ही चार वाचेने करावयाची असतात. (२) दान परित्राण आणि परिरक्षण ही करणे, हे भजन आपल्या शरीराने करावयाचे असते. ( ३ ) दया, स्पृहा आणि श्रद्धा ह्या तीन वृत्ति नेहमीं मनांत बाळगणे, ह्याला मानसिक भजन म्हणतात. जीव व ईश्वर यांत भेद आहे. जड आणि ईश्वर भिन्न आहेत. जीव निरनिराळे असतात. जीवांत आणि जडांत भेद आहे आणि जडाजडांतहि भेद आहे. अशा रीतीने ह्या प्रपंचांत पांच भेद आहेत, ह्या तत्त्वावर सर्व ब्रह्मसूत्रांचें प्रतिपादन पूर्णप्रज्ञांनी केले आहे. भगवान् श्रीविष्णूचा उत्कर्ष हाच सर्व वेदांचा अर्थ आहे. भगवद्गीतेंतील पंधराच्या अध्यायांतील भगवंताचे स्वरूप यांस पसंत आहे. (श्लोक १६-२०). नकुलीश पाशुपतदर्शन, वैष्णव मतांत जीवाचें दासत्व असावयाचेच. हा विशेष आहे. या दासत्वामुळे दुःखाचा सर्वस्वी नाश होण्यास परतंत्रता अगदी अवश्य आहे, हे उघड आहे. परतंत्रता असणे हे दुःखावह आहे. या मताप्रमाणे पूर्ण पारमैश्वर्य प्राप्त होत नाही. म्हणून ह्याच्या साहाय्याने खरी मुक्ति मिळत नाही. हे पारमैश्वर्य प्राप्त व्हावे म्हणून माहेश्वरानी आपलें एक पाशुपतशास्त्र, पंचार्याचे प्रतिपादन करणारें, असें.