पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. या नांवांनी प्रसिद्ध असलेल्या आचार्यांनी हे निराळेंच प्रस्थान प्रतिपादित केले आहे. रामानुज मतांत सांगितलेली सर्व * तत्वे त्यांस मान्य आहेत. परंतु काही परस्परविरोधी भेद रामानुजास योग्य वाटतात, ते पूर्णप्रज्ञास जैनमताचे आहेत, असे वाटून पूर्णप्रज्ञानी आपले मत स्वतंत्रपणे प्रचलित केले आहे. यांच्या मताप्रमाणे स्वतंत्र आणि अस्वतंत्र अशी दोन तत्त्वे आहेत. सर्वगुणसंपन्न अदोष भगवान् विष्णु हे स्वतंत्र तत्त्व होय. चेतन व अचेतन बाकीचे सर्व जगत् हे अस्वतंत्र तत्त्व आहे. विष्णु आणि आपण सर्व, यांमध्ये सेव्यसेवकभाव आहे. विष्णूची सेवा करण्याचे तीन मार्ग आहेत. १ अंकन, २ नामकरण आणि ३ भजन. भगवंताची नेहमी आठवण असावी म्हणून श्रीविष्णूच्या हातांत असणारी शंख, चक्र, गदा, पद्म इत्यादि आयुधे आपल्या शरीरावर काढावीत. यामुळे त्याच्या स्वरूपाचें स्मरण राहतें. केशव, नारायण, माधव इत्यादि नांवें आपल्या पुत्रादिकांची ठेवावीत, म्हणजे सहजगत्या विष्णूच्या नांवाचे कीर्तन होतें. भजन एकंदर दहा प्रकारचे आहे, तें कायेंबाचेंमनेक कन करता येते. (१) खरें बोलणे, कल्याणाच्या गोष्टी सांगणे, गोड बोलणे आणि _*टोपः-रामानुजास मान्य असलेली तत्त्वे येणेप्रमाणे. जीव अणु आहे, तो दास ( सेवक ) आहे. वेद अपौरुष, सिद्धार्थप्रति . पादक, स्वतः प्रमाण आहेत. प्रमाणे तीन आहेत. पांचरात्र. उपजीव्यत्व, प्रपंचभेदांचे सत्यत्व इत्यादि,