पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पांचरात्र. रची असते. १ देवळाच्या रस्त्याचे झाडसारवण करणे. थास अभिगमन म्हणतात. २ दुसरें उपासनाकर्म, पत्रपुष्पफलादि पूजेची सामग्री आणणे याला उपादान म्हणतात. ३ तिसरी इज्या, इज्या म्हणजे देवतेचे पूजन करणं, ४ मंत्रांचा अर्थ लावून त्यांचा जप करणे, वैष्णव सूक्ते व स्तोत्रे यांचा पाठ, नामसंकीर्तन, आणि तत्त्वप्रतिपादक शास्त्रांचा अभ्यास यास स्वाध्याय म्हणतात. ५ पांचवी उपासना योग होय. पांचरात्र मताप्रमाणे योग ह्या शब्दाचा अर्थ देवतानुसंधान असा आहे. अनुसंधानाचा अर्थ सामान्यतः शोध लावणे असा असतो. देवतेकडे मनाचे धोरण लावून चिंतन करणे, असा अर्थ योगशब्दाचा करावा. अशारीतीने उपासना कर्म केले म्हणजे विज्ञान उत्पन्न होतें. ह्या विज्ञानाच्या योगाने द्रष्टयाचें (बाह्यवस्तुविषयक ) दर्शन नाश पावते. असे झाल्यावर परमकारुणिक वासुदेव आपल्या एकनिष्ठ भक्तास आपल्या स्थानाप्रत घेऊन जातो. तेथे राहिले म्हणजे पुनर्जन्म, दुःख, वगैरे काही होत नाही. अशा भक्तीने मुक्त झालेल्या लोकांचे अंगी ईश्वराचे सर्व गुण येतात. फक्त सर्व कर्तृत्व मात्र येत नाही. तापत्रयांनी गांजलेल्या लोकांनी अमृतत्व मिळविण्यासाठी पुरुषोत्तम, वासुदेव, विष्णु, इत्यादि पदांनी समजले जाणाऱ्या ब्रह्माचे ज्ञान मिळविण्याची इच्छा करावी. हे वैष्णवमत प्रतिपादन करणारे ‘पूर्णप्रज्ञ' नांवाचें . दुसरें एक दर्शन आहे. आनन्दतीर्थ, पूर्णप्रज्ञ आणि माधव