पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेद. ज्यांत सांगितली असतात, त्यास प्रयोगविधि म्हणतात. ह्या प्रयोगास कोणी श्रौतप्रयोग म्हणतात व कोणी कल्प्यप्रयोग म्हणतात. क्रतुसंबंधी कर्माचे स्वरूप दोन प्रकारचे असते. एक गुणकर्म व दुसरे अर्थकर्म. यज्ञाच्या द्रव्यादि साधनांच्या संबंधाने में कर्म सांगितले असते, तें गुणकर्म. साधनांच्या स्थितीच्या अनुरोधानें, या गुणकर्माचे चार भाग केले जातात. १ साधन पूर्वी नसून तें उत्पन्न करावयाचे असेल. २ साधनें अस्तित्वात असून ती प्राप्य करून घ्यावयाची. ३ साधनांत विकृति किंवा विकार उत्पन्न करून त्यांचा मग उपयोग करावयाचा, आणि ४ साधनांचा संस्कार करून मग ती यज्ञकर्मात घ्यावयाची. उदाहरणांनी हे ४ प्रकार अधिक चांगल्या रीतीने समजून सांगतां येतील. “ वसंत ब्राह्मणाऽग्निमादधीत." "यूपं तक्षति" वसं. तांत ब्राह्मणाने अग्नीचे आधान ( स्थापन ) करावं. यूप तासून तयार करतो. ह्या दोन्ही उदाहरणांत अग्नि व यूप हे पूर्वी नव्हते, त्यास उत्पन्न करावयाचे आहे म्हणून यास उत्पत्तिगुणकर्म म्हणतात. २ दुसरे आप्यगुणकर्म. उ.' स्वाध्यायोऽध्येतव्यः : • गां पयः दाग्धि ' आपला अभ्यास करावा. गाईचे दूध काढतो. ह्या उदाहरणांत विद्या व दुध हीं दोन्ही अस्तित्वात आहेत, ती प्राप्त करून घेतली पाहिजेत. ३ रे विकृतिगुणकर्म, द्रव्यादिकांच्या पूर्वरूपांत विकार करून मग तें घ्यावयाचे. “बीहीनपहन्ति " .. आज्यं विलापयति "