पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ प्रस्थानभेद. ( भोगांची साधनें ) आणि भोगायतन (शरीर), हे जगताचे तीन प्रकार होत. पुरुषोत्तम, वासुदेव, इत्यादि शब्दांनी जाणला जाणारा ईश्वर हा ह्या जगताचा कर्ता व उपादान कारण आहे, वासुदेवः परंब्रह्म कल्याणगुणसंयुतः ॥ भुवनानामुपादानं कर्ता जीवनियामकः ॥ हा वासुदेव भक्तवत्सल आणि फार कृपाळू आहे. हा परमपुरुष आपल्या उपासकांस त्यांच्या योग्यतेप्रमाणे, फल देण्याकरितां आपल्या लीलेने पंचविध स्वरूपांत राहिला आहे. १ अर्चा, २ विभव, ३ व्यूह, ४ सूक्ष्म आणि ५ अन्तर्यामी, अशी ही त्याची पांच रूपे आहेत. मूर्ति, प्रतिमा इत्यादि देवाची स्वरूपें यांस अर्चा म्हणतात. राम, कृष्ण इत्यादि विष्णूचे अवतारांस विभव असें नांव आहे. वासुदेव ( सर्वकारण परमेश्वर ) त्यापासून संकर्षण ( जीव ), संकर्षणापासून प्रद्युम्न ( मन ), आणि त्यापासून अनिरुद्ध ( अहंकार ), असा हा चतुर्विध वासुदेवाचा व्यूह होय. — सूक्ष्म ' म्हणजे सुपर्ण षड्गुणसंपन्न जे परब्रह्म तो वासुदेव होय. जीवाचे ठिकाणी राहून त्याला प्रेरणा करणारा आणि नियमन करणारा जो वासुदेव त्याला अन्तर्यामी म्हणतात. ह्या प्रत्येक प्रकारच्या मूर्तीची अनुक्रमानें उपासना करून पापाचा नाश झाल्यावर पुढल्या मूर्तीची उपासना करण्यास लागावें. उपासना पांच प्रका