पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पांचरात्र. संयोग हा या दुःखाचे कारण आहे. सम्यग्दर्शन हे याला उपाय आहे, आणि अत्यन्तनिवृत्ति हीच मुक्ति होय. पतंजलीच्या योगशास्त्रावर व्यासांचे भाष्य आहे, आणि वाचस्पति व भोज यांच्या टीका आहेत. पांचरात्र. समाजांत भक्तिमार्गाची प्रवृत्ति होऊन पुष्कळ लोके भक्तिमार्गी झाल्यावर अनेक देवांची भक्ति लोक आपआपल्या आवडीप्रमाणे करूं लागले. त्यांचे विशिष्ट अधिदैवत हेंच परब्रह्म अशी समजूत होऊन त्या अनेक देवतांचे ब्रह्मैक्य प्रतिपादन करण्यात आले. श्रीविष्णु आणि शिव महादेव या देवांचे भजन आपल्या समाजांत विशेष प्रचारांत आहे. ह्या दोन मार्गाची अनेक दर्शने झाली आहेत. त्यांपैकी नारदीय पांचरात्र आणि पाशुपत या दोन मतांचा सारांश पुढे दिला आहे. रामानुज मतांत पांचरात्र मत येते. या मताप्रमाणे चित्' शब्दाने जीवात्म्याचा बोध होतो. हा जीवात्मा परमात्म्यापासून भिन्न आहे. तो नित्य, नानाविध, अणु, असा आहे. शरीर नाहीसे झाले असता, त्याचा नाश होत नाही. 'अचित् ' शब्दानें दृश्य, जड, अशा ह्या जगताचा बोध होतो. हे जगत् तीन प्रकारचे आहे. भोग्य, भोगोपकरण