पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ प्रस्थानभेद. (सू. १-४८). तिसऱ्या वर्गातील योग्यांनी पंचमहाभते, आणि इंद्रिय, यांच्यावर जय मिळविलेला असतो. चवथ्या वर्गातले योगी परमवैराग्यसंपन्न असे असतात. तिसऱ्या प्रकारच्या योग्यांनी (प्रज्ञाज्योतींतील ) महाभूते आणि इन्द्रियें जिंकली असल्याकारणाने त्यास मनोजयित्व, विकरणभाव, प्रधानजय, अशा तीन सिद्धि प्राप्त होतात. शरीराला मनाची गति मिळणे, यास मनोजयित्व म्हणतात. शरीर नसून इंद्रियास देशकालविषयादिकांसंबन्धी व्यापार करण्याची शक्ति असणे, ही विकरणभाव सिद्धि. प्रकृती सर्ववृत्तीवश करून घेणे, हा प्रधानजय होय. या तीन सिद्धींस मधुप्रतीकसिद्धि असें नांव आहे. मधाचा प्रत्येक थेंब जसा गोड लागतो, त्याप्रमाणे प्रत्येक सिद्धि गोड आहे म्हणून त्यास मधुप्रतीक म्हणतात. विशुद्धा सिद्धि प्राप्त झाली म्हणजे सत्त्व आणि पुरुष यांचा विवेक होऊन सर्वभूतांचें अधिष्ठातत्व आणि सर्वज्ञत्व ही मिळतात. ( ३) विशोका ही ज्योतिप्मती आहे. (१-३६). संस्कारशेषता नांवाच्या सिद्धीस असंप्रज्ञात किंवा निर्बीज समाधि हे नांव आहे. या अवस्थेत सर्व वृत्ती नाहीशा झालेल्या असतात. क्लेश, कर्मविपाक, आशय इत्यादि उत्पन्न करणाऱ्या कारणांचे बीज सुद्धा या अवस्थेत रहात नाही. परमवैराग्य प्राप्त होते. केवल संस्कार असतो. (सू. १-१८). यामुळे सर्व तापांपासून निवृत्ति होते. हाच मोक्षनिश्रेयस. संसार दुःखमय आहे. प्रधान व पुरुष यांचा