पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

योगदर्शन. १८३ सत्त्व गुणाचा जोर फार असतो. यामुळे आनंदित असें मन असते. म्हणून या समाधीला सानन्द समाधि म्हणतात. (४) ज्यावेळी रज व तम गुणांचा एक लेशहि नसून केवळ सत्त्व गुणाचेच अवलंबन असते, त्यावेळी चिच्छक्तीचे प्राबल्य असते, आणि ह्या चिच्छक्तीच्या उद्रेकामुळे या समाधीला सास्मित समाधि असें नांव दिले आहे. याप्रमाणे संप्रज्ञात (सबीज) समाधीचे चार पोट. भाग ( प्रकार ) आहेत. वितर्क, विचार, आनन्द आणि अस्मिता, या चार वृत्ति ह्या चार समाधींत असल्यामुळे असल्या समाधीस संप्रज्ञात समाधि असें नांव आहे. कारण त्या समाधींत या वृत्तींचे ज्ञान कायम असते; त्यांचा निरोध झालेला नसतो. ज्या समाधींत सर्व वृत्तींचा निरोध झाला असतो, त्याला असंप्रज्ञात किंवा निर्बीज समाधि म्हणतात. ... ह्याप्रमाणे योगाच्या या आठ अंगांचे अनुष्ठान आदराने निरंतर आणि दीर्घकालपर्यंत केले असता, अभ्यास आणि वैराग्य, यांच्या साहाय्याने योगांतील उत्तम समाधीची प्राप्ति होते. योग्यांच्या योग्यतेअनुरूप त्यांचे चार वर्ग केले आहेत. (१) प्राथमकल्पिक; (२) मधुभूमिक; (३) प्रज्ञाज्योति; आणि (४) अतिक्रान्तभावनीय. पहिल्या वर्गातील योग्यांत ज्योति नुसती प्रवृत्त झाली असते, परंतु दुसऱ्याच्या मनातील विचार जाणण्याची शक्ति त्यांच्या अंगी आलेली नसते. दुसऱ्या वर्गातील योग्यांचे ज्ञान सत्यमय असें असते. त्यांची ऋतंभरा प्रज्ञा असते,