पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. • असें ध्यानाचे लक्षण आहे. ८ समाधि. समाधिमध्ये केवळ अर्थाचाच निर्मास असतो, आणि स्वरूपांविषयी काही एक भान नसते. स्वरूपशून्यत्व असते. धारणा, ध्यान, व समाधि, यांस संयम म्हणतात. समाधीचे दोन भेद आहेत. (१) संप्रज्ञात आणि (२) असंप्रज्ञात. यांनाच (१) सबीज समाधि आणि (२) निर्बोज समाधि अशी अनुक्रमें दुसरी नांवे आहेत. संप्रज्ञात समाधीचे चार प्रकार आहेत.१ सवितर्क,२ सविचार,३ सानन्द आणि ४ सास्मित, समाधि हा चित्ताची एका प्रकारची अवस्था किंवा स्थिति आहे. हिला भावना म्हणतात. ह्या भावनेत विशिष्ट विषयाचे ध्यान चालू असते. हा विषय भाव्य होय. हे भाज्य दोन प्रकारचे असते (१) ईश्वर आणि (२) चोवीस तत्वें. जड आणि अजड असे तत्त्वांचे दोन भाग आहेत. प्रधान महदहंकारादि चोवीस तत्त्वे ही जड होत. पुरुष हा अजड तत्त्व आहे.(१) या जड तत्त्वांपैकी पृथ्वीत्यादि स्थूल तत्त्वांस ध्यानाचा विषय करून पूर्वापार अनुसंधानानें, शब्द, अर्थज्ञान आणि विकल्प, यांनी संभिन्न किंवा संकीर्ण झालेली जी समाधि त्याला सवितर्क समाधि असें म्हणतात. (१-४२). (२) तन्मात्रा अन्तःकरण ह्यांस ध्यानाचा विषय करून देशकालादिकांसंबन्धाने विचार ध्यानांत चालला असतो. त्यावेळी तो समाधि सविचार समाधि असतो. (३) रजः आणि तमः या गुणांनी थोडेसें विद्ध असलेल्या चित्ताची भावना ज्यावेळी असते,किंवा विचार चालला असतो, त्या वेळी