पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

योगदर्शन. सांगितली आहेत. त्यापैकी एखादे विशिष्ट आसन करून बसणे. ४ प्राणायाम. स्थिर आसन करून वसण्याची संवय झाली म्हणजे प्रागायाम करावा. श्वास व प्रश्वास म्हणजे नाकांतून वारा आंत घेणे आणि तो बाहेर टाकणे. पूरक ( वारा आंत घेणे ), कुंभक ( वायु पोटांत थांबवून ठेवणे ), आणि रेचक (म्हणजे तो बाहेर टाकणे), असे प्राणायामाचे तीन भाग आहेत. त्याविषयी नियम व प्रक्रिया योगांत सांगितलेली असतात. प्राणायामाने इंद्रिय. शुद्धि होते. ५ प्रत्याहार. यमनियमादि चार अंगांचा अभ्यास चांगला झाला आणि मन संस्कृत झाले म्हणजे मग प्रत्याहारास आरंभ करावा. इंद्रियांना आपापल्या विषयां. कडे न जाऊं देता, त्यांची ग्रहण करण्याची शक्ति किंवा विषयांकडे जाण्याची प्रवृत्ति ही बंद करून त्या इंद्रियांना चित्ताकडेच वळवून घेणे, म्हणजे सर्व इंद्रियें चित्तांत आणून ठेवणे, याला प्रत्याहार म्हणतात. चित्ताच्या स्वरूपांत त्यांचे स्वरूप मिळाले, म्हणजे, चित्तनिरोध झाल्यावर त्या इंद्रियांचाहि निरोध होतो. इंद्रियनिरोधाकरितां निराळा प्रयत्न मग करावा लागत नाही. ६ धारणा. अवांतर सर्व दुसन्या विषयांवरून चित्त एका विषयावर एका स्थानी लावून ठेवणे, याचे नांव धारणा असे आहे. एकदेशावर चिताचा बन्ध ही धारणा. ७ ध्यान. त्या एका स्थानी विशिष्ट विषयाविषयी विचार एकसारखा, खळ न पडतां, सुरूं असणे, याला ध्यान म्हणतात. प्रत्ययाची एकतानता,