पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. आणि त्याचा पगडा विद्वान लोकांवरहि चांगला बसला - असतो. या जगांत आपण जी काही बरी वाईट कम करतों त्यांच्या विपाकाचे ( फलाचे ) धर्माधर्म संस्कार आपल्या मनांवर होतात. यांस कर्माशय म्हणतात. त्यापासून प्राणीमात्रांस, जाति, आयुष्य आणि भोग प्राप्त होतात. सर्व क्लेशांचे मूळ हा कर्माशय आहे. सामान्यतः हे पांच क्लेश अभ्यास व वैराग्य आणि योगाच्या आठ अंगांच्या साधनांनी अगदी कमी करतां येतात. त्यांच्यामुळेच चित्ताच्या वृत्तींचा निरोध होतो. ही आठ अंगे पुढे सांगितली आहेत. समाधि हा या अंगापैकी शेवटचे अंग आहे. त्याचे स्वरूपहि पुढेच सांगितले आहे. योगाची आठ अंगे आहेत. पहिल्या पांचांना बहिरंगें म्हणतात. पुढल्या तीन अंगास अन्तरंगें म्हणतात. १ यम, २ नियम, ३ आसन, ४ प्राणायाम, ५ प्रत्याहार, ६ धारणा, ७ ध्यान आणि ८ समाधि. ही आठ अंगें होत. १ अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, हे पांच यम आहेत. २ शुचिर्भूतपणा, संतोष, तप, स्वाध्याय, लोभ नसणे आणि ईश्वरप्रणिधान, यांस नियम म्हणतात. ३ आसन म्हणजे स्थिर आणि सुखदायक अशी शरीराची स्थापना ( बैठक ), पद्म, स्वस्तिक, दण्डक, कुक्कुट, इत्यादि अनेक योगांतील आसनें