पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

योगदर्शन. १७२ संसारांतले क्लेश अगदी कमी करणे ( तनुकरण ), आणि समाधि ही भवाना उत्पन्न करणे, हे दोन मोठे अर्थ साध्य करून घेतले पाहिजेत. १ अविद्या, २ अस्मिता, ३ राग, ४ द्वेष आणि ५ अभिनिवेश असे पांच फार मोठे क्लेश आहेत. अनित्य, अशुचि, दुःखदायक, आणि अनात्म अशा वस्तू खरोखर नित्य, शुचि, सुखदायक आणि आत्मस्वरूपच आहेत असे समजणे, याला अविद्या म्हणतात. अज्ञान किंवा मिथ्याज्ञान ( विपर्यय ) असाच अविद्या शाचा अर्थ आहे असें सामान्यतः मानलें असतां कांहीं हरकत नाही. 'अतस्मिंस्तबुद्धिः', हे अविद्येचे लक्षण समजावें. अविद्या ही दुसऱ्या क्लेशांस उत्पन्न करते. ती त्याचे उत्पत्तिस्थान आहे. २ ( अस्मिता ) पहाणारा आणि पाहण्याची शक्ति, ही दोन्ही एकच आहेत असा जो अभिमान, त्याला अस्मिता म्हणतात. सत्व आणि पुरुष ही एकच आहेत, असे मानगें यालाच अस्मिता म्हणतात. अस्मिता म्हणजे अहंपणा. ३(राग),सुखाचे स्मरण होऊन तें साधन करून घेण्याची इच्छा, ( तृष्णा ), हीच राग होय. ४ ( द्वेष ), दुःखाचे स्मरण होऊन तें दुःख आणणान्या वस्तुविषयीं तिटकारा, याला द्वेव म्हणतात. ५ ( अभिनिवेश ) ही अमुक वस्तु माझी ही मला हवी. ही माझ्या जवळून जाईल, तिचा वियोग होईल, मी मरेन इत्यादि विनाकारण मनांत उत्पन्न होणारी काळजी व भीति, ह्याच अभिनिवेश होत. हा अभिनिवेश पूर्व संस्कारामुळे स्वतःच मनांत उत्पन्न झाला असतो,