पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ प्रस्थानभेद. चिच्छक्तीलाच भोक्तशक्ति म्हणतात. तीच आत्मा होय, ही चिच्छाक्त बुद्धितत्वांत प्रतिबिंबित झाली म्हणजे बुद्धीचे गुण तिच्या अंगी येतात असा अनुभव योतो. या रीतीने होणाऱ्या त्रिविध तापांपासून सुटका करण्यास योग हे मुख्य साधन आहे. हा योग या अनुशासनाचा विषय आहे. योगाभ्यास करून कैवल्य मिळवावें हे त्याचे प्रयोजन आहे. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे, यास योग म्हणतात . चित्ताच्या वृत्ति पांच आहेत १ प्रमाण, २ विपर्यय ( मिथ्याज्ञान), ३ विकल्प, ४ निद्रा आणि ५ स्मृति. वृत्तींचा निरोध अभ्यास आणि वैराग्य ह्यांनी होतो. चित्ताचे स्वरूपाच्या ठिकाणी चित्त ठेवण्याच्या कामी यत्न करणे, यास अभ्यास म्हणतात. सतत, निरंतर आणि दीर्घ काळपर्यंत आदराने हा यत्न चालविला असतां हा अभ्यास दृढ होतो. ऐहिक व परलोकचे विषयासंबन्धाने मनांत कंटाळा असणे आणि ते विषय माझ्या स्वाधीन आहेत, मी त्यांच्या स्वाधीन नाही अशी बुद्धि असणे, याला वैराग्य म्हणतात. क्रिया योगाच्या साहाय्याने अभ्यास व वैराग्य सुलभ होतात. तपः, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांस क्रियायोग म्हणतात. कृच्छचांद्रायण इत्यादि प्रकाराने शरीराचे शोषण करणे याला तप असे म्हणतात. प्रणव गायित्री वेद इत्यादिकांचे अध्ययन, हा स्वाध्याय होय. सर्व क्रियांच्या फळाची अपेक्षा न धरतां त्या परम गुरु जो परमेश्वर त्याला अर्पण करणे, यासच ईश्वरप्रणिधान असें नांव आहे.