पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

योगदर्शन. आहेत. ही बहिरंगें होत. ( सूत्रसंख्या ५५). ३ तिसऱ्या पादांत धारणा, ध्यान आणि समाधि ही तीन अंतरंग साधनें सांगितली आहेत. यांला संयम म्हणतात. विभूती ह्या अवान्तरफल ह्मणून प्राप्त होतात, त्यांचेंहि या पादांत वर्णन आहे. याला विभूतिपाद म्हणतात. (सूत्रं ५५). ४ चवथ्या पादांत जन्म, औषध, मंत्र, तप, आणि समाधि या पांचांपासून होणाऱ्या पांच सिद्धि यांचे सविस्तर प्रतिपादन करून या शास्त्राचे मुख्य प्रयोजन में कैवल्य ते प्रतिपादिले आहे. योगदर्शनांतील सव्विसावें तत्त्व परमेश्वर आहे, असें वर सांगितलेच आहे. हा परमेश्वर क्लेश, कर्माचा विपाक, आणि आशय, यांपासून अलिप्त आहे. अपल्या इच्छेनें तो निर्माण देहांत राहून लौकिक आणि वैदिक संप्रदाय चालू ठेवतो आणि संसारतापानें गांजलेल्या प्राण्यावर अनुग्रह करतो, असे त्या परमेश्वराचे स्वरूप आहे. कमळाप्रमाणे निर्मळ व निर्लेप अशा जीवात्म्यास संसाराचा ताप कसा होईल? आणि तो ताप शमन करण्याच्या कामी परमेश्वराचे साहाय्य घेऊन त्याचे अनुग्राहकत्व कबूल करवावे लागते. अशी कोणी शंका घेईल तर त्यावर योगमताचे उत्तर असें आहे. रजोगुणापासून संसारांत फार ताप होतो.बुद्धिरूपाने प्रगट झालेल्या सत्वगुणावर त्याची छाप बसून सत्वाला त्रास होतो. या स्थितीत तमोगुणा ( मोहा ) च्या प्राबल्याने जीवात्म्यास हा ताप आपल्या स्वतःलाच होतो आहे, असें वाटू लागते. हा मोह आत्म्यांत उत्पन्न होतो. अशा रीतीने जीवात्मा तप्त होतो.