पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. . विधि सांगतो. ३, तार्किकादि बाकीचे सर्व तत्त्ववेत्ते असें म्हणतात की विधि शब्दाचा ' इष्टसाधनता ' असा अर्थ आहे. इष्टवस्तु साधून घणे व ती साधन करून घेण्यास जी साधने लागतात, ती मिळविणे हाच विधि. विधि शब्दाच्या अर्थासबंधी याप्रमाणे तोन मते आहेत. कार्य, कर्म, त्याचे स्वरूप, अंग, फळ इत्यादि, साधनें, मंत्र, तें कर्म कसे करावे, इत्यादिविषयों ज्या वाक्यांत निर्देश असतो, तो विधि समजावा. ह्या अर्थाची वाक्ये ज्या ब्राह्मणांत, असतात तें विधिब्राह्मण समजावे. विधीचे चार भाग आहेत. १ उत्पत्ति, २ अधिकार, ३ विनियोग आणि ४ प्रयोग, ह्या चार गोष्टींच्या अनुरोधाने हे विधीचे चार भेद किंवा भाग झाले आहेत. (१) ज्यांत कर्माचें केवळ स्वरूपच सांगितलेलें असतें तो उत्पत्तिविधि समजावा. उ० --- आग्मयोऽष्टाकपालो भवति ' आग्नेय ( ग्रह --पात्र ) आठ पडांचा असतो. (२) यागादि कर्माची इतिकर्तव्यता व फल यासंबंधाचा ज्या वाक्यांत बोध असतो, ते अधिकार विधीचे वाक्य आहे असे समजावे. उ० स्वर्गाची इच्छा करणाऱ्याने शुक्ल व कृष्ण प्रतिपदस यजन करावें. ( दर्शपूर्णमासाभ्यां वर्गकामो यजेत ). (३) विनि. योगविधींत कर्माच्या अंगासंबंधी माहिती असते. उ० तांदु. ळाचे हवन करावें, समिधांचे हवन करावें. ( व्रीहीभिर्यजत; समिधायजेत.) (४) मुख्य कर्म, त्याची अंगें, त्यांच्या प्रयोगाचे ऐक्य आणि वर सांगितलले तीन विधि, ही सर्व