पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. एक दुसरा ग्रन्थ आहे. विज्ञानभिक्षु व वाचःस्पती यांचे या शास्त्रावर भाष्य व टीका आहेत. कपिल महामुनींनी प्रणीत मूलसूत्रे अशी २२ बावीस सूत्रं निराळी छापिलीं आहेत. या सूत्रांत सामान्य विषय प्रतिपादिले आहेत. योगदर्शन. . सांख्य व योग यांमध्ये मुख्यतत्त्वासंबन्धानें मतभेद नाही. पंचवीस तत्वें दोन्हीमतांस मान्य आहेत. फक्त सांख्य ईश्वरास्तित्व मानीत नाहीत. योगशास्त्रांत परमेश्वर हा सव्विसावें तत्त्व आहे, असे मानतात. म्हणून या शास्त्रास सेश्वर सांख्य असेंहि म्हणतात. सांख्याप्रमाणे योगशास्त्रहि दुसऱ्या शास्त्राहून फार प्राचीन आहे. योगानुशासन अथवा योगदर्शन हे पतञ्जलिमहामुनीनी प्रणीत केले आहे. या दर्शनाचे चार पाद आहेत. अथ योगानुशासनम् (१). योगश्चित्तवृत्तिनिरोधः (२). असा याचा आरंभ आहे. हा सूत्रात्मक ग्रन्थ आहे. एकंदर सूत्रं १९५ आहेत. पहिल्या पादांत योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध असे सांगून योगाचे लक्षण सांगितले आहे; आणि समाधीचे सविस्तर वर्णन केले आहे. या पादाला समाधिपाद म्हणतात. (सूत्रं ५१). २ दुसऱ्या पादांत तपः स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान, या क्रियायोगाने (व्युत्थित झालेल्या) चित्ताची यमनियमादि पांच साधनें सांगितली