पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांख्यदर्शन. १७५ अपेक्षा असते. याप्रमाणे परस्परापेक्षा असल्यामुळे त्यांच्या सान्निध्यामुळे सर्व सृष्टि व तिच्यांतील व्यापार सुरू आहेत. रस्त्यांत अंधळ्याची आणि पांगळ्याची गांठ पडली असतां अंधळ्याच्या खांद्यावर बसून पांगळा वाट दाखवितो आणि अशा रीतीने ते दोघेहि मार्ग क्रमण करतात, त्याचप्रमाणे प्रकृतिपुरुषांची गांठ पडून हा सर्व सृष्टिव्यापार चालला आहे. या सृष्टीतील तापत्रयापासून पुरुषाची सुटका व्हावयाची असेल तर ती प्रधान व पुरुष याच्या विवेकानेच होईल. ज्ञानादेवमुक्तिः' हे सांख्यांचे मुख्य तत्त्व आहे. रंगभूमीवर नाटकांतील पाने आपले काम करून जशी पडद्यांत जातात किंवा कळवंतीण आपला नाच दाखवून निघून जाते,त्याचप्रमाणे ज्ञान झाल्यावर प्रकृति प्रवृत्त झालेली असते, ती निवृत्त होते. विवेक हाच पुरुषार्थ होय. परमेश्वर हा करुणायुक्त होऊन जगताचा प्रवर्तक झाला आहे, असें जें परमेश्वराच्या अस्तित्ववाद्यांचे मत आहे, ते सांख्यांस कबूल नाही. त्यांच्या मताप्रमाणे या सृष्टिक्रमाला परमेश्वराची अवश्यकता मुळीच नाही. सांख्यशास्त्रावर ईश्वरकृष्णानी केलेला । सांख्यकारिका' नांवाचा एक ग्रन्थ आहे. हा ग्रन्थ संक्षिप्त असून सुबोध आहे. प्रस्तुत असलेल्या या विषयावरील ग्रन्थांत हा ग्रन्थ फार जुना आहे. ग्रन्थसंख्या फक्त ७२ आहे तथापि यांत ६० विषयांचे प्रतिपादन केले आहे. सांख्य प्रवचनें असा