पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - --- -- - प्रस्थानभेद. भिन्न सुखदुःखादिकांचा उपभोग होणार नाही. यासाठी आत्मे अनन्त आहेत. कर्माप्रमाणे त्यांच्या पाठीमागे हे भोक्तव लागले आहे. कर्मफल भोगण्यास त्या आत्म्याला अनेक जन्म घ्यावे लागतात. त्याच्या बरोबर त्याचे लिंगशरीर जात असते. अहंकार, तन्मात्रा, इंद्रिये व मन यांचा लिंगदेह बनतो. प्रकृति अथवा प्रधान हे अचेतन आहे. याच्या अंगीं सृष्टि निर्माण करण्याचे सामर्थ्य कसे असणार; म्हणून सर्वशक्तिमान् असा परमेश्वर असला पाहिजे, असे कोणी प्रतिपादन केले, तर त्यास सांख्याचे उत्तर असे आहे. प्रकृति अचेतन आहे खरी; तथापि अचेतन वस्तूंच्या अंगी कांहीं विलक्षण सामर्थ्य असते. उदाहरणार्थ. दूध अचेतन आहे, तरी पण वत्साचे पोषण व्हावे म्हणून ते जसें आपोआप उत्पन्न होते, त्याच न्यायाने पुरुषाचे उपभोगासाठी प्रकृतिपासून सर्व सृष्टि उत्पन्न झाली आहे. लोहचुंबक स्वतः नियापार असूनहि, लोखंडाच्याजवळ आला म्हणजे लोखंडांत व्यापार ( हालचाल ) उत्पन्न करतो. तशीच स्थिति पुरुषाची आहे. पुरुष स्वतः निर्व्यापार आहे, तथापि त्याच्या अंगांत अशी कांहीं आकर्षणशक्ति आहे की, त्याच्या सान्निध्याने प्रकृति आपली कार्ये करूं लागते. दोघांनाहि एकमेकांची अपेक्षा असते. प्रकृतींत भोग्यता आहे, म्हणून तिला भोक्ता पुरुष पाहिजे असतो. पुरुषाला कैवल्याची इच्छा असते, परंतु प्रकृति आणि पुरुष याचा विवेक निश्चित झाल्याशिवाय कैवल्य मिळणे कठीण आहे, म्हणून पुरुषाला प्रकृतीची