पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांख्यदर्शन स्थित होतो. असतापासून सत् उत्पन्न होते असें बौद्धांचे मत आहे. नैयायिकादि मतानुयायी लोकांचे मताप्रमाणे सतापासून असत् होते. वेदान्ती लोकांचे मत असें आहे की, हे सर्व जगत् सताचा विवर्त आहे. सतावर असताचा आध्यारोप आहे. जगत् ( अथवा ही सर्व कार्य ) सद्वस्तु नाही. सतापासून सत् उत्पन्न झाले आहे असें सांख्य मत आहे. पहिल्या तीन मतांचे खंडन सांख्यमतानुयायी लोकांनी आपल्या युक्तिवादाने केले आहे. सांख्यांस परिणामवाद मान्य आहे. ते विवर्त वाद कबूल करीत नाहीत. हे जगत् सुखदुःखमोहात्मक आहे. या जगद्रूपी कार्याचे कारण त्या कार्यात असले धर्म उत्पन्न करणारेच असले पाहिजे. सत्वगुणापासून सुख होतें, रजोगुणापासून दुःख होते, आणि तमोगुणापासून मोह उत्पन्न होतो. म्हणून या तीन गुणांची समान अवस्था जींत आहे अशी जी प्रकृति ती ह्या सर्व सृष्टीचे मूळ कारण आहे. या मूळ कारणापासून ही विचित्र सुखदुःखमोहात्मक सृष्टि निर्माण झाली आहे. हिचा उपभोग घेणारा कोणीतरी असला पाहिजे. पुरुष हा भोक्ता होय. हाच आत्मा. पुरुष नित्यशुद्ध, अपरिणामी, उदासीन, इत्यादि गुणयुक्त असा आहे. तो सुखदुःखादिकांचा भोग घेतो.देश, काल परिस्थिति यांच्या अनुरोधाने या जगांत नानाविध व अनन्त असे सुखदुःखांचे प्रकार उत्पन्न होत असतात; या सर्वांचा उपभोग घेणारे अनन्त आत्मे असणे जरूर आहे. आत्मा जर एकच असता, तर त्याला एकसमयीं व भिन्न देशी