पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ भस्थानभेद. अहंकार निर्माण झाला आणि अहंकारापासून पंच तन्मात्रा उत्पन्न झाल्या. ही सात तत्त्वे प्रकृति विकृति होत. महत् हे प्रकृतीचे कार्य (विकृति ) आहे आणि तें अहंकाराची प्रकृति ( कारण ) आहे. ह्याच प्रमाणे अहंकार . हा महताची विकृति आणि तन्मात्राची प्रकृति आहे. तन्मात्रांचे कार्य पंचमहाभूते आहेत. पांच ज्ञानेन्द्रियें, पांच कर्मेन्द्रियें, मन आणि महाभते, ही सोळा तत्त्वे केवळ विकृति अथवा विकार होत. कारण ही कोणत्याहि दुसऱ्या द्रव्याचे कारण नाहीत. यांच्यापासून दुसरे पदार्थ उत्पन्न होत नाहीत. ही सोळा तत्त्वे अहंकाराची आणि तन्मात्रांची विकृति ( कार्य ) आहेत, परंतु कोणाचीहि प्रकृति नाहीत, म्हणून त्यांसच केवलविकृति असे म्हणतात. अहंकाराच्या तामस गुणापासून तन्मात्रांची उत्पत्ति आहे; त्याच्या सात्विक गुणापासून दहाइंद्रिये व मन ही झाली आहेत. यांत रजोगुणहि आहे.पुरुष हा कोणापासून उत्पन्न झाला नाही,आणि ह्यापासून काही उत्पन्न होत नाही. हा कोणाची प्रकृति किंवा विकृति दोन्हीहि नाही. म्हणून त्याला अनुभव असें नांव दिले आहे. पुरुष कूटस्थ, नित्य अपरिणामी असा आहे, प्रत्यक्ष, अनुमान, आणि आप्तवाक्य ( शब्द ) अशी तीनच प्रमाणे आहेत, असे सांख्यतत्त्वशास्त्रांत मानिले आहे. ह्या तीन प्रमाणांच्या योगाने सर्व प्रमेयांची सिद्धि होते. कार्यकारण संबंध आहे, असे मानले असतां चार परस्पर विरुद्ध अशी मतें प्रतिपादन केली जातात, आणि त्यामध्ये वाद उप