पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लांख्यदर्शन. विरक्त झाले पाहिजे, असे या अध्यायांत सांगितले आहे. (सू. ८४) ४ चवथ्या अध्यायांत पिंगला शुक इत्यादि विरक्तांच्या आख्यायिका सांगून उदाहरणे दिली आहेत. (सू. ३२) ५ पांचव्या अध्यायांत परपक्षाचा निर्णय केला आहे, म्हणजे आपल्या पक्षाच्या विरुद्ध बोलणाऱ्या कुवादी लोकांचे निराकरण करून आपला सिद्धांतपक्ष दृढ केला आहे, (सू. २९९) ६ सहाव्या अध्यायांत सर्वशास्त्रार्थ संक्षेपाने सांगितला आहे. पूर्वी न सांगितलेला अर्थ येथे सांगून वाक्यार्थाचा उपसंहार केला आहे. ( सू. ७०) सांख्य दर्शनाच्या मताप्रमाणे एकंदर २५ पंचवीस तत्त्वे किंवा मुख्य पदार्थ आहेत. पुरुष, प्रकृति (प्रधान), महत् , अहंकार, पंचतन्मात्रा, पंच ज्ञानेन्द्रियें, मन, आणि पांच महाभूतें. हे ते पंचवीस पदार्थ होत. ह्या तत्त्वांच्या अंगी असणाऱ्या कार्यकारणधर्मावरून त्यांचे चार भाग किंवा वर्ग मानले आहेत. ह्या वर्गालाच चार अर्थ असें म्हणतात. १ केवळ प्रकृति, मल प्रकृति (प्रधान) २ रा प्रकृतिविकृति; ३ रा केवल विकृति किंवा विकार आणि ४ था अनुभव म्हणजे प्रकृति नाही व विकृतिहि नाही. प्रधान किंवा प्रकृति ही सर्वांचे उपादानकरण आहे. सत्व, रजः आणि तमः, या तीन गुणांची ही साम्यावस्था होय. हिला उत्पन्न करणारे कारण कांहीएक नाही, म्हणून हिला मूल प्रकृति, केवल प्रकृति किंवा अमूलमूल असें म्हणतात. प्रकृतीपासून महत्तत्त्व ( अन्तःकरणादि ) झाले. त्यापासून