पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० प्रस्थानभेद. सांख्यदर्शन. सांख्य वै योग ही दोन शास्त्रे वस्तुतः स्वतंत्र ग्रंथ आहेत. त्यांची धर्मशास्त्रांत कां गणना व्हावी हे कळत नाही. न्यायमीमांसादिकांप्रमाणे ह्यांतहि तात्त्विक विचार आहे. सांख्यशास्त्र कपिल महामुनींनी प्रणीत केले आहे, अशी परंपरा आली आहे. हे मत फारच प्राचीनकाळी प्रतिपादित होऊन त्याचा प्रसार चोहोंकडे झाला असावा, असे वाटते. सांख्यसूत्रे एकंदर ५२७ आहेत. त्याचे सहा अध्याय आहेत. विविध दुःखापासून अत्यन्त निवृत्ति होणे हाच पुरुषार्थ. प्रकृति व पुरुष यांच्यामधील भेद समजन, त्यांचे विवेकज्ञान झाले असतां, मनुष्य कृतकृत्य होतो, ही गोष्ट समजून देणे, हा या शास्त्राचा मुख्य हेतु आहे. सांख्यसूत्रांचे पहिल्या अध्यायांत या शास्त्राच्या मुख्य चार अर्थीचं ( विषयाचें) निरूपण केलें आहे. १ प्रकृति. २ प्रकृतिविकृति; ३ विकृति किंवा विकार आणि ४ प्रकृति व विकृतिरहित पुरुष (हेयहाने तयोर्हेतू चेति व्यूहा यथाक्रमम् सू. १६५) दुसन्या अध्यायांत प्रकृति किंवा प्रधान यांची कार्ये सांगितली आहेत. लिंगदेहाचे घटक तन्मात्रा, ज्ञानेंद्रियें, कमेंद्रियें, अहंकार, मन, इत्यादिकांचे प्रतिपादन येथे केलें आहे. ( स. ४७ ). ३ तिसऱ्या अध्यायांत विवेकाचें अथवा परमवैराग्याचे प्रतिपादन केले आहे. विषयांपासून