पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- धर्मशास्त्र. स्थितीप्रमाणे या धर्माचरणांत अंतर पडण्याचा संभव असल्यामुळे कदाचित् प्रसंगानुरोधाने निरनिराळ्या वेळी अनेक ऋषींनी अनेक स्मृती केल्या असाव्यात. तथापि मुख्य तत्त्वासंबंधाने त्यांत फरक नाही. मनु आणि याज्ञवल्क्य या दोघांच्याच स्मृती सध्या प्रचलित आहेत. त्यांचा गोषवारा येथे देता येत नाही. तथापि मनच्या स्मृतींत कोणकोणत्या विषयांचे प्रतिपादन मुख्यतः केलें आहे, हे सांगितलें असतां सर्व स्मृतींतील विषयांची सामान्यतः कल्पना येईल असे वाटते. म्हणून त्या स्मृतींतील मुख्य विषय टित सांगितले आहेत* ___* टीपः-जगाची उत्पत्ति, संस्कारविधि, ब्रह्मचर्य, विद्यासमाप्ति, ( स्नान ). विवाह, विवाहलक्षणे, पंचमहायज्ञ, श्राद्धे, स्नातकांची व्रतें, वृत्ति, त्यांचे लक्षण, भक्ष्याभक्ष्य, शौच, द्रव्यशुद्धि, स्त्रीधर्म, योग, तापस्य, मोक्ष, संन्यास, राजाचे धर्म, राजाची कार्ये, त्यांचा निर्णय, व्यवहार, साक्षिप्रश्नविधान, स्त्रीपुरुषांचे नव.. राबायकोचे] धर्म, ऋक्थभाग, विभाग धर्म, चूत, चोरादिकांचे निरसन, वैश्यशूद्रांचे धर्मानुष्ठान, संकीर्ण वर्णाचा संभव, अनुलोम प्रतिलोम वगैरे, आपद्धर्म, प्रायश्चित्ते, कर्मसंभव जन्मादि कर्माचे गुणदोष, देशधर्म, जातिधर्म, कुलधर्म, पाषंडगणधर्म इत्यादि,