पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६८ प्रस्थानभेद. धर्मशास्त्रे. धर्मशास्त्रे ही वेदांचे चवथें व शेवटचे उपांग होय. ऋषिप्रणीत स्मृती, इतिहास, सांख्य आणि योग ( ही दोन दर्शनें ) या सर्वांचा धर्मशास्त्रांत अन्तर्भाव होतो. वाल्मी. कींनी केलेले रामायण आणि व्यासाचें महाभारत ह्या दोन ग्रंथांस इतिहास ही संज्ञा आहे. हे ग्रंथ सर्वश्रुत असल्यामुळे त्याविषयी विशेष लिहिण्याची अवश्यकता नाही. प्राचीनकाळी अनेक प्रसंगी अनेक ऋषींनी लोकांना मार्गदर्शक म्हणून अनेक स्मृती लिहून ठेवल्या. त्या सर्वच आतां उपलब्ध आहेत असे नाही. तथापि बावीस ऋषींच्या स्मृती बऱ्याच प्रसिद्ध आहेत. त्या बावीस ऋषींची नांवें येणेप्रमाणे:-१ मनु, २ याज्ञवल्क्य, ३ विष्णु, ४ यम, ५ अंगिरस, ६ वसिष्ठ, ७ दक्ष, ८ संवत, १ शातात्प, १० पराशर, ११ गौतम, १२ शंख, १३ लिखित, १४ हारीत, १५ आपरतम्ब, १६ उशनस्, १७.व्यास, १८ कात्यायन, १९ बृहस्पति, २० देवल, २१ नारद आणि २२ पैठिनसि इत्यादि. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे मनुप्यांचे चार वर्ण आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास हे वयपरत्वें चार आश्रम आहेत. या वर्णाश्रमांचे विशेष धर्म असतात. त्या धर्माचें विश्वासपूर्वक आचरण करणे, हे हिंदुधर्माचे मुख्य तत्त्व आहे. काल, देश, वर्तमान यांच्या