पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा. सद्वस्तूवर असद्वस्तूचा आरोप झाल्यावर जें अन्यथा ज्ञान ( किंवा मनांत भाव ) उत्पन्न होते. ते दोन प्रकाराने होतें ? मूळवस्तूच्या स्वरूपांत सर्वस्वी बदल होऊन निराळेच रूप उत्पन्न होते. उदाहरणार्थ दूध विरजल्यावर दही होते. हे दही अगदी भिन्न होते. त्यांत दुधाचे स्वरूपाचा काहीएक अंश रहात नाही. या रूपान्तरास विकार किंवा परिणाम असें ह्मणतात. ( २ ) दुसऱ्या प्रकारचा जो भेद दिसून येतो, त्यांत मूळवस्तूचे स्वरूप कायम असते, आणि या स्वरूपांत वस्तुतः भेद न होतां अन्यथाज्ञान भ्रान्तीने उत्पन्न होते. या रूपान्तरास विवर्त असें नांय आहे. परिणामवाद आणि विवर्तवाद, हे फार मोठे वाद आहेत. त्यांविषयी येथे लिहिणे अगदी अशक्य आहे. सारांश अज्ञान सर्व काढून टाकून ब्रह्मस्वरूप समजून घेतले पाहिजे. हे ब्रह्मस्वरूप प्रतिपादन करणारी महावाक्ये बारा आहेत. ती येथे सांगून वेदान्तमीमांसेचा सारांश संपविला पाहिजे. १ ' तत्त्वमसि,' २ अहंब्रह्मास्मि; ३ अयमात्मा ब्रह्म; ४ एव त आत्मान्तर्याम्यमृतः ५-६ स यश्चायं पुरुषे, यश्चासावादित्ये स एकः ७ प्रज्ञाप्रतिष्ठा, प्रज्ञानंब्रह्म, ८ विज्ञानमानन्दं ब्रह्म, ९ सत्यंज्ञानमनन्तं ब्रह्म, १० सएवमेष पुरुषो ब्रह्म, ११ सर्वं खल्विद ब्रह्म, १२ एकमेवाद्वितीयम् ॥ ही महावाक्ये निरनिराळ्या उपनिषदांतून घेतलेली आहेत.