पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेद. ऋक् व साम यांहून निराळे जे गद्यात्मक मंत्र, त्यास 'यजुः' हे नांव आहे. संबोधनवाचक शब्द आणि संभाषण यांचाहि अन्तर्भाव यजु शब्दांत होतो. · अग्निमीळे (डे ) पुरोहितं, यज्ञस्य देवमृत्विज, होतारं रत्नधातमम् ' ॥' इमं मे वरुणशधि हवमद्या च मूळय ' (डय) इत्यादि ऋचा होत. ' अम आयाहि वीतये गणानो हव्यदातवे' इत्यादि ऋचा असूनहि साम आहेत. ' इषेत्वोर्जेत्वा, ' यजमानस्य पशून् पाहि, ' ' अग्नीदग्नीन्विहर ' या चारहि यजु आहेत. ब्राह्मणः यज्ञयागादि प्रकरणासंबंधानें मंत्र, तंत्र, सामग्री, त्यांची तयारी, त्यांच्या गोष्टी, वेदान्तविचार इ० विषय ब्राह्मणांत सांगितलेले असतात. हे ब्राह्मण तीन प्रकारचे असतें. (१) कर्माचा विधि सांगणारे ब्राह्मण, (२) अर्थवाद करणारे आणि ( ३ ) विधि आणि अर्थवाद यांहून भिन्न विषयाचे प्रतिपादन करणारे; असे ब्राह्मणाचे तीन प्रकार आहेत. तिसऱ्या प्रकारच्या ब्राह्मणांत बहुतकरून कर्म द्रव्यादिकांविषयीं गोष्टी, इतिहास आणि ब्रह्मविचार असतात. ' विधि ' या शब्दाचे अर्थासंबंधाने बराच मतभेद आहे. (१) कुमारिलभट्टाचे मताचे लोक ( भाट्टा: ) विधि शब्दाचा अर्थ शब्दभावना असा करतात. त्यांच्या मताप्रमाणे विधि ह्मणजे केवळ मंत्रांच्या शब्दाविषयों किंवा शब्दावरून त्याच्या अर्थाविषयीं निश्चय. २ पूर्वमीमांसानुयायी (प्राभाकर ) विधि मणजे योग असे म्हणतात. कोणत्या कर्मात कोणत्या मंत्रांचा उपयोग करावयाचा, हे मंत्राच्या अर्थावरून