पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६६ प्रस्थानभेद. चतुर्थ ब्रह्म म्हणतात. महावाक्यांत ह्या परब्रह्माचा विचार केलेला आहे. ह्या प्रत्यगात्म्याच्या ( परब्रह्माच्या ) स्वरूपाबद्दल अनेक तत्त्ववेत्त्यांचे मिथ्या अध्यारोपामुळे निरनिराळे मत झालेले आहे. ही गोष्ट पूर्वी सांगितलीच आहे. परंतु ती मनांतचांगली ठसावी, ह्मणून ती मते पुनः येथे सांगितली आहेत. अतिप्राकृत लोक आपल्या मुलाबाळांसच आत्मा समजतात. चार्वाक मताचे लोक या स्थूल शरीरासच आत्मा ह्मणतात. दुसरे चार्वाकपंथी लोक इन्द्रिये हीच आत्मा आहेत असे मानतात. कांहीं चार्वाकमताचे लोक प्राणाला आत्मा ह्मणतात. दुसरे काही चार्वाकपंथी लोक मन हेच आत्मा आहे असे समजतात. विज्ञानवादी बौद्ध लोकांच्या मताप्रमाणे बुद्धि हीच आत्मा आहे. प्रभाकर आणि तार्किक यांच्या मतानुरोधानें ज्ञान हेच आत्मा आहे असे ते ठरवितात. भट्टाचार्यांचे अनुयायी अज्ञानाने उपहित में चैतन्य त्यालाच आत्मा मानतात. माध्यमिक बौद्धांचे मत असे आहे की सर्व शून्य आहे, ह्मणून शून्य हेच आत्मा होय. या सर्व मतांस वेदान्तवाक्यांचा आधार आहे, हे खरे आहे; तथापि प्रबल वेदान्तवाक्याच्या आधाराने त्यांचे खंडन वेदांतमतांत केले आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध, सत्यस्वभाव, प्रत्यक्चैतन्य, असा हा आत्मा आहे असें वेदांताचे मत आहे. .